Weight Loss: सध्याच्या धावपळीच्या जगात अन् कामाच्या तणावामुळं अनेकांचं तब्येतीकडं दुर्लक्ष होतंय. तसेच अनेकांना लठ्ठपणाची समस्या उद्भवते. परंतु, लठ्ठपणामुळं शारिरिक आणि मानसिक आजारांचादेखील सामना करावा लागतोय. वाढणाऱ्या वजनामुळे अनेकजण खूप त्रस्त आहेत. दरम्यान, नियमितपणे योगा केल्यानं लठ्ठपणा झपाट्यानं कमी होतो. योगामुळं रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. जर तुमच्याकडे सकाळी योगासने करण्यासाठी वेळ नसेल तर आम्ही तुम्हाला एक अतिशय सोपा योगासन सांगत आहोत, जे दुपारी म्हणजे जेवणानंतर करू शकतात.


दररोज दुपारी जेवण केल्यानंतर फक्त 15 मिनिटे वज्रासन करावं. वज्रासन करणे जितके सोपे आहे, तितकेच त्याचे फायदेही जास्त आहेत. वज्रासन हे पचनसंस्था मजबूत करण्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. जे लोक एकाच जागी अनेक तास बसून काम करतात, त्यांच्यासाठी वज्रासन खूप फायदेशीर आहे. त्यामुळं पायाच्या स्नायूंवर अतिरिक्त दबाव येतो आणि शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित सुरू होतो. वज्रासन नियमित केल्यानं शरीर सुडौल होतं आणि वजन कमी होण्यासही मदत होते. 


वज्रासनाचे फायदे
1) वज्रासन केल्याने शरीराचा मध्य भाग सरळ राहतो.
2) या आसनाने डोळ्यांची दृष्टी उजळते.
3) मन स्थिर करते आणि मन तीक्ष्ण करते.
4) शरीरातील रक्तभिसरण सुधारते आणि रोगापासून संरक्षण मिळते.
5) वज्रासन केल्यानं पचनशक्ती वाढते
6) अन्नपचन आणि बद्धकोष्ठता दूर करण्याचे काम करते.
7) पोटातील वात दूर करून पोटाचे आजार दूर करतात.
8) वज्रासनामुळं वजन कमी होण्यास आणि शरीर सुडौल बनण्यास मदत होते.
9) पाठीचा कणा, कंबर, मांडी, गुडघा आणि पायात ताकद आणि ताकद येते.
10) कंबर व पायांचे वाताचे आजार दूर होतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)
 
हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha