Cough Remedies : रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर हिवाळ्यात खोकला, ताप, सर्दी यांसारख्या आजारांचा सामना करावा लागतो. खोकल्यावर वेळीच उपचार केला पाहिजे. खोकला हे कोरोनाचे एक लक्षण आहे. पण घरगुती उपायांनी खोकल्यापासून बचाव करता येऊ शकतो. 


लवंग आणि मध ( Clove And Honey) दोन्ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. लवंगाचा वापर अन्नपदार्थांमध्ये केला जातो. जेवणाला चांगली चव येण्यासोबतच लवंग आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. लवंगात भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.


भाजलेली लवंग : लवंगात अँटिऑक्सिडेंट आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात.  तसेच अनेक आजारांवर लवंग फायदेशीर आहे.


मध : कफसाठी घरगुती उपाय म्हणून मध सर्वोत्तम मानले जाते. त्यातील अँटीऑक्सिडंट्स जंतूंशी लढण्यास मदत करतात. याशिवाय घशातील खवखव दूर करण्यासाठीही मध महत्त्वाचे आहे. हर्बल टी किंवा लिंबूपाण्यात दोन चमचे मध मिसळून दिवसातून दोनदा प्या.


हळद : गरम दुधात हळद मिसळून प्यायल्यास सर्दी आणि खोकल्याशी लढण्यास मदत होते. झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात हळद मिसळून प्या. सर्दी आणि खोकल्यापासून लवकर आराम मिळेल.


निलगिरी : निलगिरी तेल श्वसनमार्ग स्वच्छ करते. खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये निलगिरीचे थेंब मिसळून छातीला मसाज करा. याशिवाय गरम पाण्यात निलगिरी तेलाचे थेंब मिसळून वाफ घेता येते. निलगिरी छाती हलकी करते आणि श्वास घेणे सोपे करते. घरगुती उपयांनीही तुम्हाला बरं वाटत नसेल किंवा त्रास तीव्रतेनं वाढत असेल तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार घ्या.


संबंधित बातम्या


Vitamin D For Kids : मुलांमध्ये 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेमुळे हाडे आणि प्रतिकारशक्ती कमकुवत होते, 'या' आजारांचा वाढतो धोका


Omicron in Kids : काळजी घ्या! चिमुकल्यांना ओमायक्रॉनचा अधिक धोका, लागण झालेल्या मुलांमध्ये 'ही' पाच लक्षणे


Diabetes Control: मधुमेह झालाय? मग, ‘या’ पदार्थांपासून दूर राहणेच ठरेल आरोग्यासाठी उत्तम!


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha