(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पालथं झोपताय? झोपेच्या स्थितीचा आरोग्यावर काय परिणाम होतो? तज्ञ सांगतात..
Sleeping Position effect on Body: पुरेशा झोपेसह तुम्ही कसे झोपता यावरही अनेक गोष्टी अवलंबून असल्याचे तज्ञ सांगतात. सर्वोत्तम आणि सर्वात वाईट झोपेची स्थिती कोणती?
Sleeping Position effect on Body: आपण ज्या स्थितीत झोपतो त्याचाही तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो हे तुम्हाला माहित आहे का? अनेकदा आपल्या घरातील मोठी माणसे पालथं न झोपण्याचा सल्ला आपल्याला देतात. यामुळे श्वासोच्छवासासह हृदयावर परिणाम होतो का? पालथा झोपल्यानंतर हार्ट अटॅक येऊ शकतो का? तज्ञ काय सांगतात? बदलत्या जीवनशैलीमुळे अपुरी झोप आणि त्यामुळे वाढणारे हृदयाच्या संबंधित विकारांमध्ये वेगाने वाढ होताना दिसत आहे. प्रत्येकाच्या शरीराला झोप ही अत्यंत आवश्यक असते. अपुऱ्या झोपेमुळे शरीरावर गंभीर परिणाम होतात.
झोपेच्या स्थितीचा आरोग्यावर परिणाम
शरीर निरोगी ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे. अपुऱ्या झोपेमुळे रक्तदाब जळजळ रक्तातील साखरेची पातळी यांचे नियमन करणारे अनेक घटक झोपेवर अवलंबून असतात. पुरेशा झोपेसह तुम्ही कसे झोपता यावरही अनेक गोष्टी अवलंबून असल्याचे तज्ञ सांगतात. अनेकांना पालथ झोपायची सवय असल्याने छातीवर दबाव निर्माण होऊन रक्तप्रवाह कमी होणे किंवा श्वसनाच्या समस्यांना सामोरे जावं लागतं. याचा एकत्रित ताण मज्जातंतून वर येऊन हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीत विकार होण्याची शक्यता असते.
पालथं झोपल्याने हार्ट अटॅक येतो का?
तज्ञ सांगतात, हृदयविकार हा प्रामुख्याने रक्तवाहिन्यांच्या भोवती चरबी जमा झाल्याने तसेच कोलेस्ट्रॉल सारख्या कारणांमुळे होतो. पालथ झोपण्याचा आणि हार्ट अटॅक येण्याचा थेट संबंध नसल्याचेही तज्ञ सांगतात. मात्र हृदयविकाराचा झटका येणं याआधी स्नायूंना रक्तपुरवठा खंडित होणाऱ्या अनेक क्रिया घडत असतात. पालथे झोपल्याने छातीवरील दबाव वाढवून अशा समस्या येऊ शकतात. श्वसनाच्या समस्याही या झोपेच्या स्थितीत येऊ शकतात.
सर्वोत्तम आणि सर्वात वाईट झोपेची स्थिती कोणती?
बहुतेक लोकांना एका अंगावर किंवा पोटावर झोपण्याची सवय असते. तुमच्या झोपेची स्थिती ही तुम्हाला आरामदायक वाटणारी असली तरी त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो का हे पाहणं गरजेचं आहे. तज्ञांच्या मते, ज्या झोपेच्या स्थितीत तुम्हाला चांगला श्वासोच्छ्वास घेता येतो ती स्थिती सर्वात चांगली आहे. सांधेदुखी किंवा डाव्या बाजूला रेलून झोपण्याची स्थिती ही फरशी योग्य मानली जात नाही. डावीकडे झोपताना छातीतील अवयवांवर ताण येऊन फुफुसांवर भार पडू शकतो. ज्यामुळे रक्तदाब तसेच किडनीच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
हेही वाचा:
Gen Z आणि मिलेनिअल पिढीला कॅन्सरचा धोका सर्वाधिक, लॅन्सेटचा अहवाल, नक्की कशामुळे वाढलाय धोका?
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )