Health : आजकालचे धकाधकीचे जीवन, बदलती जीवनशैली, अनियमित खाण्यामुळे तणाव ही एक सामान्य समस्या बनली आहे. वाढत्या चिंतेमुळे मनात तणाव निर्माण होत आहे. अगदी व्यावसायिकांपासून ते नोकरी करणारे लोक आता चिंतेचे बळी ठरू लागले आहेत. यामुळेच अलीकडच्या काळात मानसिक तणावाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. तुम्हालाही या गोष्टींचा त्रास होत असेल, तर काही योगासनांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. जाणून घ्या


तुम्हीही तणावाचे शिकार असाल तर...


सध्याच्या व्यस्त जीवनामुळे लोक तणावग्रस्त बनले आहेत. त्यामुळेच हळूहळू मानसिक समस्या वाढू लागल्या आहेत. तुम्हीही तणावाचे शिकार असाल तर, योगा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. योगाची अशी अनेक आसने आहेत. जी मानवी मनाला आराम देतात. जर ही योगासने सकाळी केली, तर ती व्यक्तीला दिवसभर तंदुरुस्त राहण्यास मदत करतात.


भुजंगासन


भुजंगासन हे सर्वोत्तम योग आसनांपैकी एक मानले जाते. हा योग केल्याने मणक्याला बळकटी मिळते. छाती, खांदे आणि पोटाचे स्नायू देखील उपयुक्त आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भुजंगासन योग्य प्रकारे केल्याने तणाव आणि थकवा दूर होतो. त्या व्यक्तीला दिवसभर चांगले वाटते. जेव्हा एखादी व्यक्ती तणावाखाली नसते. तेव्हा तो इतर कामंही चांगल्या प्रकारे करतो.


शवासन


जर तुम्ही शवासन केले तर ते तुमच्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. शवासनाची खास गोष्ट म्हणजे ते तुमच्या शरीराला पूर्णपणे आराम देते. हे योगासन उच्च रक्तदाब आणि चिंताग्रस्त लोकांसाठी रामबाण उपाय आहे. याशिवाय हे आसन केल्याने मेंदूलाही फायदा होतो. तज्ज्ञांच्या मते, हे आसन तुमची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवते. या आसनामुळे तुमची एनर्जी लेव्हल वाढते.


कपाल भाती


कपाल भाती श्वसनाच्या रुग्णांसाठी रामबाण औषधापेक्षा कमी नाही. कपाल भाती रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यास मदत करते. या योग आसनामुळे फुफ्फुसाची क्षमता वाढते. त्याचबरोबर शरीरात साचलेले विषारी पदार्थ बाहेर टाकतात. तसेच, जर तुम्हाला तणावाचा त्रास होत असेल तर हे तुमच्यासाठी खूप प्रभावी आसन असू शकते. हे केल्यावर तुम्हाला मानसिकदृष्ट्याही शांत वाटेल.


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>


Travel : शिमला, मनाली, डलहौसी विसराल! जेव्हा एप्रिलमध्ये यापेक्षाही 'भारी' हिल स्टेशनला भेट द्याल