Travel : उन्हाळा म्हटलं की जाव नकोसा होतो. एकतर प्रचंड गरमी, शहरातील ट्राफिक, लोकांची गर्दी, जिकडे-तिकडे मोठमोठ्या गगनचुंबीमुळे निसर्गाचे सौंदर्य, निवांतपणा कुठेतरी हरवत चाललाय. धकाधकीचे जीवन, करिअरच्या मागे धावणे यामुळे कुटुंबाला तसेच जोडीदाराला वेळही देता येत नाही. यामुळे जीवनातील काही क्षण आनंदात, निवांत जावं यासाठी लोक सुट्ट्या प्लॅन करतात. आजकाल लोकांचं ठरलंय, एकतर शिमला, मनाली नाहीतर डलहौसी.. पण नेहमीपेक्षा दुसरे निवांत ठिकाण आणि गर्दी नको हवी असेल तर आजच्या लेखात सांगितलेले हे ठिकाण एकदा जाणून घ्या


कडक उन्हाळ्यापासून दिलासा मिळावा म्हणून...


भारतात मार्च-एप्रिलपासून उन्हाळा सुरू होतो. अशा कडक उन्हाळ्यापासून दिलासा मिळावा म्हणून लोकांना सुट्टी मिळताच हिल स्टेशनवर जाणे आवडते. आम्ही तुम्हाला येथील ऑफबीट हिल स्टेशनबद्दल माहिती सांगत आहोत, जेथे तुम्ही जाण्याची योजना करू शकता. भारतातील हवामान मार्च-एप्रिलच्या आगमनाने बदलते. याच मोसमात उन्हाळाही सुरू होतो. विशेषत: मुलांच्या परीक्षाही संपतात आणि लोक कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत करतात. या महिन्यांत उष्मा जरा जास्तच वाढत असल्याने लोकांना हिल स्टेशनवर जावेसे वाटते. 


मार्च-एप्रिल महिना जाईल निवांत


मात्र या ठिकाणी गर्दी होत असल्याने तासनतास रहदारीत वेळ काढावा लागतो. येथे अधिक पर्यटक येत असल्याने येथील हॉटेल्सही फुल्ल राहतात. जर तुम्ही एप्रिल महिन्यात कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल तर या दोन ठिकाणांऐवजी तुम्ही भारतातील इतर काही ठिकाणे देखील पाहू शकता. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया…


 




पंचमढी


जर तुम्हाला गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायचे असेल तर तुम्ही मध्य प्रदेशातील एकमेव हिल स्टेशन पंचमढीला जाण्याचा विचार करू शकता. सातपुडा टेकडीवर वसलेल्या पंचमढीला भेट देऊन तुम्हाला शांतता जाणवेल. इथे आल्यावर निसर्गाच्या सान्निध्यात आल्याची अनुभूती मिळेल. येथे तुम्हाला धबधबे आणि गुहा देखील पाहायला मिळतील.


मेघालय


जर तुम्हाला वेगळं ठिकाण शोधायचं असेल तर तुम्ही मेघालयलाही भेट देऊ शकता. एप्रिलमध्ये येथील तापमान उष्ण किंवा थंड नसते. निसर्ग आणि साहसप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही. इथे भरपूर धबधबे आहेत. येथे तुम्हाला ट्रेकिंग देखील करू शकता.


 




उटी


तमिळनाडूचे उटी हे केवळ हनिमूनचे डेस्टिनेशन नाही, तर तुम्ही कुटुंब आणि मित्रांसह येथेही जाऊ शकता. असं असलं तरी एप्रिलमध्ये उटीमध्ये पर्यटक जमायला लागतात. तुम्ही इथे भेट द्यायला येत असाल तर दोड्डाबोट्टा शिखर आणि टायगर हिल्स पाहायला चुकवू नका. याशिवाय तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर चहाच्या बागांचे फोटो जरूर घ्या. यामुळे तुमची सहलही अविस्मरणीय होईल.


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>


 


Travel : विदेशातील 'थायलंड' विसराल, जेव्हा भारतातील 'मिनी थायलंड' पाहाल, कमी बजेटमध्ये अनुभवा स्वर्गसुख!