Temperature increased in Maharashtra : दिवसेंदिवस राज्यातील तापमानात मोठी वाढ (Temperature increased in Maharashtra) होताना दिसत आहे. वाढत्या तापमानामुळं अंगाची काहीली होत आहे. नागरिकांना वाढत्या उष्णतेचा त्रास होत असून, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात उष्माघाताच्या (Heatstroke) 13 रुग्णांची नोंद झाली आहे. बीडमध्ये (Beed) सर्वाधिक चार रुग्ण तर रायगडात दोन रुग्णांची नोंद झालीय. दरम्यान, या वाढत्या तापमानात किंवा  उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारनं (Maharashtra Govt) काही मार्गदर्शक सुचना जारी केल्यात. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. 


राज्यातील वाढत्या तापमानाचा मोठा फटका नागरिकांना 


राज्यातील वाढत्या तापमानाचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय. आत्तापर्यंत उष्माघाताच्या 13 रुग्णांची नोंद झालीय. बीडमध्ये चार तर रायगडमध्ये दोन रुग्णांची नोंद झालीय. अहमदनगर, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, धुळे आणि साताऱ्यात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आलीय. या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.


उष्माघातापासून संरक्षणासाठी राज्य सरकारच्या सूचना


दरम्यान, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारनं काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. नेमक्या काय आहेत सचना त्याबद्दलची माहिती पाहुयातय


1) तुम्हाला तहान लागली नसली तरीही दिवसभर भरपूर प्रमाणात पाणी प्या 


2) दिवसाच्या सर्वात जास्त उष्णता असलेल्या वेळेत (सामान्यत: सकाळी उशिरा ते संध्याकाळ) म्हणजे सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत घरात किंवा सावलीच्या ठिकाणी राहा.


3) कापसासारख्या कपड्यांपासून बनवलेले हलके, सैल कपडे घाला. गडद रंगाचे कपडे परिधान करणे टाळा 


4) घराबाहेरील, विशेषत: दिवसाच्या सर्वात उष्ण वेळेत (सामान्यत: सकाळी उशिरा ते संध्याकाळ) कामे कमी करण्याचा प्रयत्न करा


5) तुमच्या चेहऱ्याचे आणि डोळ्यांचे सूर्यापासून संरक्षण करण्यासाठी रुंद टोपी आणि सनग्लासेस घाला 


6) मुले, वृद्ध कुटुंबातील सदस्यांवर लक्ष ठेवा, कारण त्यांना उष्णतेशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते 


उष्माघाताची लक्षणे कोणती? 


1) अती घाम येणे
2) अशक्तपणा येणे
3) चक्कर येणे
4) मळमळ होणे 


ही लक्षणे तुम्हाला किंवा इतर कोणाला आढळल्यास ताबडतोब वैद्यकीय मदत घेणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो. त्यामुळं राज्य सरकारनं काळजी घेण्यासाठी मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. 


काय काळजी घ्यावी?


तुमच्याकडे वातानुकूलन (एयर कंडिशनर) नसेल, तर हवा खेळती राहण्यासाठी पंखे वापरा आणि तुमची राहण्याची जागा थंड करा. स्थानिक हवामान अंदाज आणि अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या तापमानासंबंधीच्या सूचनांकडे लक्ष द्या. दिवसाच्या सर्वाधिक तापमान असलेल्या वेळेत सामाजिक मेळावे घेणे टाळा.


महत्वाच्या बातम्या:


तापमानाचा पारा वाढणार, चटका बसणार; पुढील दोन दिवस राज्यात कुठं कसं असेल हवामान?