Health Care Tips : खाण्यापिण्याच्या सवयींचा परिणाम आयुष्यावर होत असतो. महिलांचं अनेकदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. व्यायामासाठी व्यवस्थित वेळ देता येत नाही. दररोज 7000 पाऊलं चालल्यानं मृत्यूचा धोका 50 ते 70 टक्क्यांनी कमी होत असतो. प्रतिदिवशी 10 हजारापेक्षा जास्त पाऊलं चालत असलेल्यांच्या शरीरावर फारसा परिणाम झाला नाही. रोज 7000 पेक्षा जास्त पाऊलं चालत असलेल्यांमध्ये मृत्यूचा धोका 50 ते 70 टक्क्यांनी कमी होतो.
जेवण झाल्यावर किती चालायचं?
रोज रात्री जेवल्यानंतर 15-20 मिनिटं चाललं पाहिजे. जर वेळेची काही अडचण नसेल तर जास्त वेळ चालावं. जेवण झाल्यानंतर एक तासाच्या आत चालायला जायला हवं , तरच त्याचा फायदा होतो.
सकाळी चालण्याचे फायदे
जेव्हा आपली नीट झोप झालेली असते तेव्हा शरीराचं तापमान वाढलेलं असतं. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर चालायला गेल्यास शरीरातील विषारी पदार्थ सहजपणे बाहेर टाकले जातात. सकाळी चालण्यामुळे शरीराचं शुध्दीकरण होतं. तसेच आपल्या फुप्फुसांना शुध्द हवा आणि ऑक्सिजन मिळतो. ही हवा आणि ऑक्सिजन आपल्या फुप्फुसांसोबतच मेंदूचं आरोग्यही चांगलं राखण्यास मदत करतं. आयुर्वेद आणि विज्ञान या दोन्हींच्या मते चांगल्या आरोग्यासाठी सकाळी चालण्याला पर्याय नाही.
चालण्याआधी हे लक्षात ठेवा
- वॉर्म अप केल्याशिवाय मुख्य व्यायाम सुरु करायचा नाही.
- हळूहळू, निवांत, गप्पा मारत चालून व्यायाम होत नाही.
- व्यायाम करतांना आपल्या हृदयाची गती वाढली पाहिजे आणि आपल्याला घाम आला पाहिजे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
Winter Care Tips : हिवाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी; घरीच तयार करा कॉफी फेसपॅक
Weight Loss Tips : झटपट वजन कमी करायचंय? दररोज फॉलो करा 'या' टिप्स
थंड पाण्याने आंघोळ करण्याचे आहेत जबरदस्त फायदे!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha