Cold Showers Promote Weight Loss: तुम्ही जर थंड पाण्यानं अंघोळ करत असाल तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर गोष्ट आहे. थंड पाण्यानं अंघोळ केल्यानं तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करणं ही एक मोठी आणि दमवणारी प्रक्रिया आहे. वजन कमी करण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. काही जण डाएटिंगचा आधार घेतात तर काही जॉगिंगला जातात. काही लोक योग करतात. पण न धावता आणि डाएटिंग न करताही तुम्ही वजन कमी करु शकता. थंड पाण्याने आंघोळ करुन तुम्ही वजन घटवू शकता.
 
तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, थंड पाण्याने आंघोळ केल्याने वजन कमी होतं.


ही पूर्णत: वैज्ञानिक प्रक्रिया आहे. आपल्या शरीरात व्हाईट फॅट आणि ब्राऊन फॅट असे दोन प्रकारचे फॅट असतात. व्हाईट फॅटची तशी आवश्यकता नसते. शरीरात प्रमाणापेक्षा अधिक कॅलरी निर्माण होते आणि हे फॅट बर्न होत नाही, तेव्हा हे फॅट जमा होतं. हे व्हाईट फॅट कंबर, पाठीचा खालचा भाग, मान आणि जांघांमध्ये जमा होतं.
 
तर ब्राऊन फॅट शरीरासाठी चांगलं असतं. हे फॅट हीट जनरेट करण्याचं काम करतं, ज्यामुळे आपलं शरीर उष्ण राहतं. आपल्याला जेव्हा थंडी वाजते, तेव्हा ब्राऊन फॅट सक्रीय होतं. जेव्हा आपण थंड पाण्याने आंघोळ करत, तेव्हा हे फॅट वेगाने वितळायला सुरुवात होते. याचा सरळ अर्थ म्हणजे तुमची वाढलेली चरबी कमी होते.
 
थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे :
 
1. थंड पाण्याने आंघोळ केल्याने रक्ताभिसरण वाढलं. ज्यामुळे चरबी वितळते. यासोबत थंड पाण्याने आंघोळ केल्याने रोगप्रतिकार शक्तीही सुधारते.
 
2. थंड पाण्याने आंघोळ केल्याने तणावही कमी होतो.
 
3. जर तुम्हाला डिप्रेशनचा त्रास असेल तर थंड पाण्याने आंघोळ करणं फायदेशीर ठरेल.
 
4. थंड पाण्याने आंघोळ केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते.
 
5. थंड पाण्याने आंघोळ केल्यास तुमचे केस आणि त्वचा चमकदार होते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.



संबंधित बातम्या


Skin Care In Winter: हिवाळ्यात त्वचेची घ्या अशी काळजी; ट्राय करा या सोप्या टिप्स


Omicron Coronaviras : ओमायक्रॉनचा धोका वाढतोय; जाणून घ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे उपाय


Health Tips: हिवाळ्यात पोटदुखीचा त्रास होतोय? करा हे घरगुती उपाय