Covid Can Cause Heart Attack : कोरोनाकाळात ह्रदयविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं आढळून आलं आहे. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना ह्रदयविकाराचा धोका अधिक असतो, असं एका संशोधनात समोर आलं आहे. कोरोना संसर्गातून बरे झालेले रुग्ण हार्ट अटॅकसाठी हायरिस्कवर असतात, असं अभ्यासात आढळून आलं आहे. कोरोना विषाणूचा हदयावर परिणाम होतो, असं या अभ्यासात दिसून आलं. कोरोना विषाणू ह्रदयाच्या स्नायूंना कमकुमत करतो, असं या संशोधनात आढळलं.
कोरोना विषाणूचा ह्रदयावर काय परिणाम होतो?
कोरोना विषाणूचा ह्रदयावर परिणाम होतो. कोविड 19 विषाण हदयाच्या स्नायूंना कमकुवत बनवतो. कोविड विषाणू स्पाइक प्रोटीनद्वारे शरीरातील निरोगी पेशींपर्यंत पोहोचतो आणि नंतर एन्झाईम 2 (ACE2) वाढवून तेथे विषाणूची संख्या वेगानं वाढवतो. विषाणू वाढ होत असताना सुरुवातीला व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती विषाणूशी लढते. याशिवाय हृदयाची स्वतःची रोगप्रतिकारक यंत्रणा देखील असते. संशोधनात असं आढळून आलं आहे की, कोरोना विषाणूसोबत आपल्या शरीरात रोगप्रतिकारक यंत्रणा लढते, पण संसर्ग जास्त असल्यास हा विषाणू ह्रदयासाठी धोकादायक ठरु शकतो. कोविड विषाणूमुळे ह्रदयाला इजा किंवा नुकसान होऊ शकते. कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे ह्रदय कमकुवत होते. यामुळे ह्रदयविकाराच्या धोक्याचं प्रमाण अधिक असतं.
कोविड विषाणूमुळे हृदयाला दोन प्रकारे धोका असतो. पहिला धोका म्हणजे संसर्गामुळे हृदयाच्या पेशींना थेट नुकसान पोहोचतं. दुसरं म्हणजे कोविड विषाणूच्या संसर्गादरम्यान स्पाइक प्रोटीनद्वारे शरीरातील निरोगी पेशींपर्यंत पोहोचतो आणि विषाणू हृदयापर्यंत पोहोचल्यानं नुकसान होते. संशोधनात समोर आलं आहे की, कोविड दरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या हृदयाची आणि निरोगी व्यक्तीच्या हृदयाची तपासणी केल्यावर आढळलं की एखाद्याला कोविड संसर्ग झाला असेल, तर थेट हृदयाचे स्नायू कमकुवत होऊन हृदयाला हानी पोहोचते.
संशोधनात असेही आढळून आले की, कोविड दरम्यान सर्वाधिक दाखल झालेल्या रुग्णांपैकी 62 टक्के रुग्णांना हृदयविकार होते. दाखल न झालेल्या रुग्णांनाही हृदयविकाराचा धोका जास्त होता. कोविडनंतर, हृदयविकाराच्या रुग्णांची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्यांच्यामध्ये हृदयाचे ठोके वाढणे किंवा मंद होणे, रक्त गोठण्याच्या समस्या आढळून आल्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
इतर संबंधित बातम्या