एक्स्प्लोर

Earbuds hearing loss: वायरलेस हेडफोन वापरताय ? मग एकदा हे वाचाच ; कायमचा बहिरेपणा येण्याची शक्यता, तज्ञ  सांगतात ..

जर हेडफोन्सचा सतत वापर केला तर कानात शिट्टी किंवा रिंग सारखा आवाज येण्याची समस्या येऊ शकते .

Earbuds hearing loss:  आपल्यापैकी अनेकजण  रस्त्याने चालताना, काम करत असताना किंवा अनेकदा झोपतानाही हेडफोन आणि इयरफोन वापरताना दिसतात . कधीतरी दुसऱ्यांना त्रास होऊ नये म्हणूनही हेडफोन वापरला जातो . बाहेरच्या जगाचा पूर्ण आवाज थांबवण्याची क्षमता असलेला वायरलेस हेडफोन आपल्या कानांचे किती नुकसान करू शकतो याची  कल्पनाही आपल्याला नसते . मार्केटमध्ये नवनवीन प्रकारचे ब्लूटूथ इयरफोन आणि वायरलेस हेडफोन (Wireless Headphones) उपलब्ध असताना लहान मुलांपासून ते कॉलेजवयीन तरुणांसह वयोवृद्ध लोकांपर्यंत अनेकांकडे वायरलेस हेडफोन आहेत . यामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या असल्या तरी  ही सवय तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवर गंभीर परिणाम करणारी आहे .  चला जाणून घेऊया वायरलेस हेडफोन सतत कानावर असले तर त्याचा धोका किती ?

वायरलेस हेडफोनचा कितपत धोका ?

वायरलेस हेडफोनचा सतत वापर करत असाल तर नक्कीच तुम्हाला धोका आहे .बीएमजे ग्लोबल हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार,  हेडफोन मुळे सुमारे एक दशलक्ष म्हणजेच दहा लाख किशोरवयीन मुले आणि प्रौढांची  ऐकण्याची क्षमता कमी होण्याचा धोका वाढला आहे .या संशोधनात असे आढळून आले की बारा ते 34 वर्षे वयोगटातील 24 टक्के लोक  ' अनसेफ लेवल ' वर गाणी ऐकतात . 

या आजाराचा गंभीर धोका

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितल्यानुसार, जगभरात सर्व वयोगटातील जवळपास 43 कोटी लोकांना ऐकण्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत . WHO नुसार, जर तुम्ही आठ तास किंवा त्यापेक्षा अधिक काळ 85 डेसिबल पेक्षा अधिक आवाज ऐकत असाल तर तुमची ऐकण्याची क्षमता हळूहळू संपू शकते . अतिउच्च आवाजात काही ऐकत असाल तर . Noise induced Hearing Loss (NIHL ) या आजाराचा गंभीर धोका जाणवू शकतो .

ऐकण्याची क्षमता संपण्यासह दुसऱ्याही अनेक प्रकारच्या समस्या तुम्हाला उद्भवू शकतात . यामध्ये ear canelमध्ये घाम आणि बॅक्टेरिया जमा होऊ लागतो .आणि हेच इन्फेक्शन वाढत जाते . NIH आणि FDA मध्ये झालेल्या अनेक संशोधनांमध्ये झालेल्या अभ्यासात, हेडफोन्समुळे निघालेलं रेडिएशन खूप कमी आहे .आणि ते तितकेसे धोकादायक नाही . यामुळे कर्करोगाचा आणि कोणत्याही प्रकारचा मोठा धोका उद्भवत नाही . यावर सध्या संशोधन सुरू आहे .पण जर हेडफोन्सचा सतत वापर केला तर कानात शिट्टी किंवा रिंग सारखा आवाज येण्याची समस्या येऊ शकते .

 हेडफोनचा योग्य वापर कसा कराल ?

Who च्या मार्गदर्शक सूचनांनुसार, तुम्ही  60 टक्क्यांपेक्षा जास्त आवाज ऐकू नयेत .किंवा 60 मिनिटांपेक्षा जास्त ऐकू नयेत .आवाज कट करणारे हेडफोन वापरण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला आवाज वाढवण्याच्या आवश्यकता भासणार नाही .

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Health: पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
National Organ Donation Day: एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
Embed widget