मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेकजण आता घरुन ऑनलाईन काम करत आहेत. ऑफिसमध्ये काम करत असताना कर्मचाऱ्यांसाठी योग्य ती सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. मात्र घरी ती व्यवस्था उपलब्ध नसते. त्यामुळे अनेकजण तासंतास चुकीच्या पद्धतीने बसून आपलं काम करत असतात. बेडवर किवां सोफ्यावर काम करत बसल्याने अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. जास्त वेळ एकाच स्थितीत बसल्याने आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे.


जास्त वेळ बसण्याचा धोका


काम करताना जास्त वेळ एकाच स्थितीत बसल्याने मान आणि पाठदुखी सामान्य गोष्ट आहे. मात्र या गोष्टीची सवय लागणे घातक आहे. यामुळे कॅन्सर सारख्या गंभीर रोगाचा धोका उद्धभवू शकतो. याशिवाय हृदयविकारच्या समस्यांचीही वाढ होण्याची शक्यता आहे.


मेडिकल जरनल जेएएमए ऑन्कोलॉजीने केलेल्या एका सर्व्हेत चकीत करणारी बाब समोर आली आहे. सर्व्हेनुसार जास्त वेळ बसून राहिल्याने कॅन्सर होण्याची शक्यता आहे. याशिवाय हृदयाचे विकारही होण्याची शक्यता आहे. चार वर्षात 8000 लोकांवर संशोधन करण्यात आलं. लोकांच्या राहणीमानाचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये जास्त वेळ बसल्याने किंवा फिजिकली अॅक्टिव्ह नसणाऱ्या लोकांना कॅन्समुळे मृत्यूचा 82 टक्के धोका आहे. जास्त वेळ बसणाऱ्या लोकांपेक्षा अॅक्टिव्ह असणाऱ्या आणि व्यायाम करणआऱ्या लोकामध्ये हा धोका कमी प्रमाणात आहे. रोज चालणे, जास्तीज जास्त सायकलिंग करणे यासारख्या अॅक्टिव्हिटी करणाऱ्या लोकांना कॅन्सरने मृत्यूचा धोका 31 टक्के आढळलं आहे. त्यामुळे चालणे, व्यायाम करणे गरजेचं आहे.


वर्क फ्रॉम होममुळे आळस वाढला


ऑफिस म्हटलं की फिरणे, व्यायाम करणे, लोकांना भेटणे, गप्पा गोष्टी करणे, प्रवास करणे या सर्व अॅक्टिव्हिटी होतात. मात्र वर्क फ्रॉम होममुळे घरातून बाहेर जाणे बंद झालं आहे. शहरांमध्ये जागा कमी असते, त्यामुळे घरात फिरणे शक्य नसते. त्यामुळे फिजिकल अॅक्टिव्हिटी कमी होते. त्यामुळे शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम, चालणे फिरणे गरजेचं आहे. कारण कॅन्सर आणि आळस याचा परस्पर संबंध आहे. त्यामुळे आळस दूर करणे गरजेचं आहे. रोज व्यायाम आणि फिजिकल अॅक्टिव्हिटीमुळे कॅन्सरसारख्या आजारांपासून बचाव होऊ शकतो.


वर्क फ्रॉम होममध्ये स्वत:ला अॅक्टिव्ह कसं ठेवाल?




  • एक तासांहून अधिक वेळ झाला की थोडावेळ उठून चाला, फिरा.

  • पाणी पिण्यासाठी किचनमध्ये स्वत: तासाभराने उठा.

  • एखादा महत्त्वाचा फोन आला तर बसून न बोलता उठा आणि चालत-फिरत बोला.

  • स्वत:ची कामं स्वत: करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा.

  • जेवण काम करण्याच्या ठिकाणी न करता दुसऱ्या ठिकाणी करा.


Community Corona Spread | भारतात कोरोनाचा समूह संसर्ग, दररोज 30हजार रुग्णांची वाढ चिंताजनक - IMA