Overnight Homemade Hair Mask : हिवाळ्यामध्ये (Winter) त्वचेची (Skin Care Tips) नाही, तर केसांचीही (Hair Care Tips) काळजी घ्यावी लागते. कारण थंडीमुळे त्वचा आणि केस अधिक कोरडे पडतात. हिवाळ्यामध्ये थंडीमुळे केस आणि टाळू कोरडी (Dry Scalp) होऊन केस तुटण्याची भीती असते. अशावेळी काही घरगुती हेअर मास्क (Homemade Hair Mask) तुमच्या केसांना मुलायम बनवून अधिक सुंदर, मुलायम आणि मजबूत होण्यासाठी मदत करतात. या घरगुती हेअर मास्कबाबतजाणून घ्या...
ऑलिव्ह ऑईल (Olive Oil) आणि एलोवेरा (Aloe Vera) जेल हेअर मास्क
- पद्धतऑलिव्ह ऑईल आणि एलोवेरा जेल एकत्र करुन मास्क बनवा. हे मास्क केसांना लावा. हे मास्क केसांना कंडिशनिंग करून कोरड्या टाळूवर उपायकारक आणि फायदेशीर आहे. हा हेअरमास्क रात्रभर केसांना लावून ठेवा आणि सकाळी सौम्य शाम्पूने धुवा.
- कसे वापराल?केसांवर हा हेअर मास्क वापरण्यापूर्वी केस व्यवस्थित विंचरून घ्या.केसांचे दोन समान भाग करा. या मिश्रणाने टाळूवर चांगली मालिश करा. रात्रभर हे केसांना लावून ठेवा.दुसऱ्या दिवशी सकाळी केसांना शॅम्पू करा आणि कंडिशनर वापरा. हे आठवड्यातून 2 दिवस केसांना लावा.
खोबरेल तेल (Coconut Oil), एरंडेल तेल (Castor oil) आणि बिअर (Beer) हेअर मास्क
- पद्धतएरंडेल तेल मुलायम आणि चमकदार केस मिळविण्याचा एक उत्तम मार्ग आहे. यासाठी सुमारे चार चमचे कोमट एरंडेल तेलामध्ये दोन चमचे खोबरेल तेल आणि एक चमचा बिअर मिसळा आणि मिश्रण तयार करा.
- कसे वापराल?या मिश्रणाने हलक्या हाताने केसांना 15-20 मिनिटे मालिश करा. त्यानेतर हे मास्क केसांना लावून रात्रभर ठेवा. सकाळी सौम्य शाम्पूने मास्क धुवा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Trending : आधी अॅसिड तोंडावर फेकलं... पश्चात्ताप झाल्यानंतर त्याच तरुणीसोबत लग्न
- iPhone SE 3 : अॅपल आणणार आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 'आयफोन SE 3', 'हे' भन्नाट फिचर्स
- नागालँडमधील अफ्स्पा कायदा मागे घेण्यासाठी समिती गठीत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha