Risk of Death in COVID-19 : जगभरात कोरोनाचा (Coronavirus) विळखा अधिक घट्ट होताना दिसत आहे. चीन (China), जपान (Japan), अमेरिका (America) आणि दक्षिण कोरियासह (South Korea) अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच आता कोरोना विषाणू संदर्भात आणखी एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर 18 महिन्यानंतर या विषाणूमुळे तुमचा मृत्यू होऊ शकतो. शास्त्रज्ञांनी नव्या रिपोर्टच्या आधारे हा दावा केला आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे.


Covid 19 Elevates Risk of Death : 18 महिन्यानंतरही कोरोनामुळे होऊ शकतो मृत्यू


शास्त्रज्ञांनी नव्या अहवालानुसार दावा केला आहे की, कोरोना महामारीदरम्यान अनेक प्रकरणं समोर आली आहेत ज्यामध्ये कोरोनाला संसर्गावर मात केल्यानंतर काही दिवसांनी लोकांचा मृत्यू झाला. लोकांची चिंता वाढवणारा नवा अहवाल समोर आला आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतरही कोरोनाचा धोका कमी होत नाही. अहवालानुसार, कोरोनातून बरे झाल्यानंतर 18 महिन्यांपर्यंत कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये हृदयाशी संबंधित आजारांचा धोका जास्त असतो.


Heart Disease in Covid Patients : कोरोना रुग्णांमध्ये हृदयविकाराचा धोका


युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या (ESC) जर्नलमध्ये हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी नवीन अहवाल प्रकाशित झाला आहे. या संशोधनानुसार, कोरोनाबाधित रुग्णांमध्ये हृदयाशी संबंधित आजारांची अधिक लक्षणे आढळून आलीत, ज्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो. 1,60,000 लोकांवर संशोधन करुन हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. चीनच्या हाँग विद्यापीठाचे प्रोफेसर इयान सीके वोंग यांनी सांगितले की, "संशोधनाच्या निष्कर्षांवरुन असे दिसून येते की कोविड-19 चे रुग्ण या संसर्गातून बरे झाल्यानंतर किमान एक वर्ष त्यांचे निरीक्षण करणे गेले पाहिजे."


Risk of Death after Coronavirus : तीन आठवड्यांपर्यंत धोका 81 पटीने जास्त


या अहवालानुसार, कोरोना संसर्ग न झालेल्या लोकांपेक्षा कोरोनाची लागण झालेल्या लोकांमध्ये संसर्गातून बरे झाल्यावर पहिल्या तीन आठवड्यांत हृदयविकाराने मृत्यूची शक्यता 81 पटीने जास्त होती. तसेच कोरोनातून बरे झाल्यानंतर 18 महिन्यांनंतर मृत्यूची शक्यता पाच पटीने जास्त होती. अहवालानुसार, कोरोना रूग्णांना गंभीर हृदयविकार होण्याची शक्यता जवळजवळ चार पट जास्त होती. असंक्रमित रुग्णांपेक्षा संक्रमित गटामध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 40 टक्क्यांनी जास्त होती. कोविड-19 च्या रुग्णांमध्ये गंभीर हृदयविकार होण्याची किंवा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते.


महत्त्वाच्या इतर बातम्या


Covid Vaccine : कोविड लसीमुळे फक्त कोरोना नाही कॅन्सरपासूनही बचाव, संशोधनात उघड