Corona Kraken Variant aka XBB.1.5 : कोरोना विषाणूचा 'क्रॅकेन' व्हेरियंट (Kraken Variant) सर्वात वेगाने पसरणारा विषाणू आहे. युरोपिय संघाच्या रोग नियंत्रण विभागाने सांगितले आहे की, अमेरिकेत कोरोनाच्या क्रॅकेन व्हेरियंटचा प्रसार वेगाने होत आहे. लसीकरणानंतरही (Covid Vaccine) या विषाणूच्या संसर्गाचा धोका आहे. या व्हेरियंटमुळे दिवसागणिक कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. मोठ्या प्रमाणात लोक क्रॅकेन व्हेरियंटच्या संसर्गाला बळी पडत आहेत. दरम्यान, क्रॅकेन हा कोरोनाचा नवीन व्हेरियंट नाही. कोरोनाच्या एक्सबीबी 1.5 व्हेरियंटलाच (XBB.1.5 Variant) 'क्रॅकेन' व्हेरियंट (Kraken Variant) असंही म्हटलं जाते.


Kraken Variant : XBB.1.5 व्हेरियंटलाच क्रॅकेन असं नाव


शास्त्रज्ञांकडून ओमायक्रॉनच्या XBB.1.5 या स्ट्रेनला क्रॅकेन असे टोपणनाव देण्यात आले आहे. त्यामुळे क्रॅकेन हे नवीन नाव ऐकून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. हा आधीच अस्तित्वात असलेला कोरोनाचा सब-व्हेरियंट आहे. मात्र, नागरिकांना खबरदारी बाळगण्याची आवश्यकता आहे. कारण क्रॅकेन म्हणजेच XBB.1.5 हा कोरोना विषाणूचा सर्वाधिक संसर्गजन्य प्रकार आहे. सध्या अमेरिकेमध्ये XBB 1.5 व्हेरियंटने कहर माजवला आहे. अनेकांना याचा संसर्ग झाला आहे.


Kraken Variant : XBB 1.5 व्हेरियंट


XBB 1.5 व्हेरियंट कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूच्या दोन म्यूटेशन म्हणजेच सबव्हेरियंटचा मिळून तयार झाला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, कोरोनाचा हा प्रकार सर्वाधिक संसर्गजन्य आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण लसीकरण झालेल्या देशांमध्येही XBB व्हेरियंटचा प्रसार वेगाने होत आहे.


Kraken Variant : अमेरिकेतील 41 टक्के रुग्णांना क्रॅकेनचा संसर्ग


अमेरिकेसह अनेक देशांमध्ये XBB 1.5 व्हेरियंटचा वेगाने प्रसार होत आहे. भारतासह सुमारे 28 देशांमध्ये क्रॅकेन विषाणूचा संसर्ग पसरला आहे. IMA कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांच्या मते, XBB.1.5 ही XBB चा अपग्रेड प्रकार आहे. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (CDC) आकडेवारीनुसार, अमेरिकेतील 41 टक्के रुग्णांना क्रॅकेन प्रकाराचा संसर्ग झाला आहे. युरोप, ऑस्ट्रेलिया आणि आग्नेय आशियातील काही ठिकाणी XBB.1.5 ची प्रकरणे आढळून आली आहेत.


Kraken Variant : भारतातील वेगवेगळ्या व्हेरियंटचे रुग्ण किती?


देशात रविवारी 163 नवीन कोरोनाबाधित आढळले. देशात BQ.1.1 व्हेरियंटचे दोन रुग्ण आहेत तर, ओमायक्रॉनच्या XBB व्हेरियंटचे सात, BF.7 व्हेरियंटचे पाच रुग्ण आहेत. तसेच सध्या 2423 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या


Superbug : चिंता वाढली! कोरोनानंतरचा दुसरा सर्वात मोठा धोका बनणार 'सुपरबग', एक कोटी मृत्यू होण्याची शक्यता