Corona Vaccine Protects Blood Cancer Patients : कोविड लस (Covid Vaccine) फक्त कोरोना विषाणूपासूनच (Coronavirus) नाही, तर कर्करोगासारख्या (Cancer) गंभीर रोगापासूनही तुमचा बचाव करते, असे एका संशोधनात समोर आले आहे. साधारणपणे, रक्ताचा कर्करोग (Blood Cancer) असलेल्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत असते. यामुळे असे रुग्ण कोरोना विषाणूला सहज बळी पडतात आणि अधिक आजारी पडतात. दरम्यान, कर्करोगाच्या अनेक उपचारामुळे रुग्णाच्या शरीरात नव्या अँटीबॉडीज तयार होत नाहीत. हे उपचार नवीन अँटीबॉडीज तयार होण्यास प्रतिबंध करतात. त्यामुळे कर्करोग असलेल्या रुग्णाला कोरोनाचा धोका अधिक असतो. मात्र, कोरोना लसीकरणामुळे रुग्णाच्या शरीरातील टी सेल्स सक्रिय होतात, यामुळे रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती दीर्घकाळापर्यंत टिकून राहू शकते.
संशोधनात 'ही' बाब उघड
LMU म्युनिक-युनिव्हर्सिटी ऑफ फ्रीबर्गंडच्या मेडिकल सेंटरचे विषाणूशास्त्रज्ञ प्रा. ऑलिव्हर टी. केप्लरच्या डॉ. अँड्रिया केप्लर-हॅफकेमेयर आणि डॉ. क्रिस्टीन ग्रील यांच्या नेतृत्वाखालील टीमने अनेक महिने रुग्णांच्या रोगप्रतिकारक शक्तीचा अभ्यास आणि निरीक्षण केल्यानंतर अहवाल जारी केला आहे. कर्करोग झालेल्या रुग्णांवर हे संशोधन करण्यात आले आणि ज्यांना कोरोना लसीचे तीनही डोस मिळाले होते. संशोधनाच्या अहवालानुसार, कोरोना लसीकरणामुळे या रुग्णांना SARS-CoV2 मुळे होणाऱ्या गंभीर आजारांपासून संरक्षणासाठी मदत झाली.
कोविड-19 लसीकरणामुळे टी सेल सक्रिय
या संशोधनात दोन प्रकारच्या रक्ताचे कर्करोग असलेल्या रुग्णांचा समावेश करण्यात आला. बी-सेल लिम्फोमा आणि मल्टिपल मायलोमा हे कर्करोग असलेल्या रुग्णांवर हे संशोधन करण्यात आले. डॉ. अँड्रिया केपलर-हॅफकेमेयर यांनी सांगितले की, या संशोधनातील सहभागी सर्व रुग्णांवर केलेल्या या संशोधनात असे दिसून आले आहे की, कोविड-19 लसीकरण झालेल्या सर्व रुग्णांच्या शरीरात टी सेल्स मोठ्या प्रमाणात सक्रिय आणि मजबूत होते. संशोधनात सहभागी झालेल्या रुग्णांमध्ये कोरोना संसर्गाची लक्षणे सौम्य ते मध्यम गंभीर स्वरूपाची असल्याचे आढळून आले. याच कारण म्हणजे कोरोना लसीकरणानंतर तयार होणाऱ्या अँटीबॉडीज कॅन्सर थेरपीमुळे तयार होऊ शकले नाहीत.
कोरोनाच्या विविध प्रकारांविरुद्ध लढण्यासाठी अँटीबॉडीज
अभ्यासातून असे दिसून आले आहे की जे रुग्ण प्रतिपिंड बनवू शकतात ते उच्च दर्जाचे प्रतिपिंड देखील तयार करू शकतात. दुसऱ्या लसीकरणानंतर तयार होणारे प्रतिपिंड SARS-CoV-2 च्या विविध प्रकारांना निष्प्रभ करतात. लसीकरण झालेल्या लोकांच्या तुलनेत या रुग्णांमध्ये ही क्षमता खूप जास्त आहे. कोविड-19 लसीकरणामुळे विविध प्रकारचे रक्त कर्करोग असलेल्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर 'अँटीबॉडीज तटस्थ करणे' यासह विषाणूविरोधी प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते. परिणामी, बी-सेल लिम्फोमा किंवा मल्टिपल मायलोमा असलेल्या रूग्णांसाठी व्यत्यय न घेता एकाधिक लसी डोसची शिफारस केली जाऊ शकते.
महत्त्वाच्या इतर बातम्या