Long Covid treatment : संपूर्ण जग कोरोना महामारीच्या विळख्यात सापडलं होतं. काही जण यातून बरे झाले तर काहींना अजूनही या आजाराचा सामना करावा लागतोय. यामध्ये लाँग कोविड (Long Covid) ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतरही दीर्घ काळापर्यंत कोरोनाची काही लक्षणे जाणवू शकतात. यामध्ये जागतिक स्तरावर पाहिल्यास पुरुषांपेक्षा स्त्रियांना या लक्षणांचा जास्त त्रास होण्याची शक्यता असते. 


कोरोना ज्या व्यक्तींना झाला ते या आजारातून बरेही झाले. मात्र, कोरोनानंतरही त्यांना अनेक शारीरिक अडचणींचा सामना करावा लागला. कोरोना झाल्यानंतर ही लक्षणं आहेत ती तुमचा लवकर पाठलाग सोडत नाहीत. त्यामुळे अशा उपचारांना अधिक वेळ द्यावा लागतो. याच लक्षणांवर मात करण्यासाठी 'Blood Washing' हा उपचार सध्या ट्रेंडमध्ये आहे. काय आहे हा उपचार जाणून घ्या. 


दीर्घ कोरोना लक्षणांसाठी ब्लड वॉशिंग :


ब्रिटीश आउटलेट्स ITV News आणि The BMJ च्या अहवालानुसार, स्वित्झर्लंड, जर्मनी आणि सायप्रससह विविध देशांतील लाँग कोरोनाने ग्रस्त हजारो लोक खाजगी दवाखान्यांमध्ये ब्लड वॉशिंग ट्रिटमेंटचा वापर करत आहेत. या टेक्नॉलॉजीला ऍफेरेसिस असेही म्हणतात. आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की, दीर्घकाळापर्यंत कोविडच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी अजून याला मान्यता देण्यात आली नाही. 


ब्लड वॉशिंग म्हणजे काय?


ब्लड वॉशिंग ही एक सायन्स टेक्नॉलॉजी आहे. सामान्यतः लिपिड विकारांसाठी वापरले जाते आणि सिकल सेल रोगासारख्या विशिष्ट परिस्थितींसाठी प्रभावी असल्याचे म्हटले जाते. यामध्ये असामान्य लाल रक्त पेशी काढून टाकल्या जाऊ शकतात.


ब्लड वॉशिंगने काय होते?


ब्लड वॉशिंग या ट्रिटमेंटमध्ये मोठ्या सुयांचा वापर केला जातो. ज्या हातामध्ये टोचल्या जातात. प्लाझ्मापासून लाल रक्तपेशी वेगळे करण्यासाठी फिल्टरमधून रक्त जाते. नंतर, प्लाझ्मा पुन्हा लाल रक्तपेशींसह आणला जातो आणि वेगळ्या रक्तवाहिनीद्वारे शरीरात पुन्हा भरला जातो.


ब्लड वॉशिंग प्रभावी आहे का?


Apheresis मध्ये रुग्णांना anticoagulants देणे देखील समाविष्ट आहे. क्रॉनिक कोरोनाची लक्षणे रक्तातील लहान गाठींमुळे होतात, ज्यामुळे ऑक्सिजनचा प्रवाह रोखला जातो. याचा अर्थ असा की, रक्तामध्ये रक्ताभिसरण करणारे घटक फिल्टर करण्यासाठी ऍफेरेसिस केले जाते. 


ब्लड वॉशिंग सुरक्षित आहे का?


ब्लड वॉशिंग ही ट्रीटमेंट जरी महाग असली तरी भारतात अजूनही मान्यता देण्यात आली नाही. सर्वात मोठा अडथळा म्हणजे या उपचाराची हमी देता येत नाही. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 


महत्वाच्या बातम्या :