Amla For Diabetes : चवीला तुरट आणि आंबट असणारा आवळा (Amla) प्रत्येकालाच आवडतो असं नाही. मात्र, आवळ्याला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे. व्हिटॅमिन सी (Vitamin C) ने समृद्ध असलेला आवळा आरोग्याच्या दृष्टीनेही फार बहुपयोगी आहे. याच्या सेवनाने तुम्ही केवळ आरोग्याच्या समस्यांवर मात करू शकत नाही. तर, त्वचा आणि केसांच्या समस्या दूर करण्यातही आवळा प्रभावी आहे. आवळ्याचा वापर मधुमेहाच्या रूग्णांसाठीही होतो. मधुमेहामध्ये तुम्ही आवळ्याचे थेट सेवन करू शकता, याशिवाय आवळ्याचा रस मधुमेहाच्या रुग्णांसाठीही खूप आरोग्यदायी आहे. आवळ्याचा रस कसा बनवायचा ते जाणून घ्या. 


आवळ्याचा रस कसा बनवायचा?



  • मधुमेहाच्या रुग्णांसाठी आवळ्याचा रस बनविण्यासाठी सर्वात आधी 7 ते 8 आवळे पाण्यात चांगले उकळवा.

  • त्यानंतर त्यातील बिया काढून बाजूला ठेवा.   

  • आता 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेऊन तव्यावर गरम करा.

  • आता ही मिरची आणि लसूण चांगले बारीक करून घ्या. 

  • उकळलेले आवळे चांगले कुस्करून घ्या. 

  • आता त्यात अर्धा चमचा मोहरीचे तेल घाला. यासोबत चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घाला.

  • तुमचा आवळा रस तयार आहे. 


मधुमेहामध्ये आवळ्याचा रस कसा फायदेशीर? 


मधुमेहाच्या रुग्णांना आवळ्याचा रस प्यायल्याने खूप फायदा होतो. वास्तविक, त्यात व्हिटॅमिन सी सारखे अँटीऑक्सिडंट असतात. जे रक्तातील साखर कमी करण्यात प्रभावी असतात. याशिवाय मधुमेहादरम्यान होणार्‍या समस्याही यामुळे कमी होतात. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 


महत्वाच्या बातम्या :