Maharashtra Coronavirus Update : आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात दोन हजार 336 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, राज्यात आज 2311 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
शनिवारी राज्यात 2336 नव्या रुग्णाची नोंद झाली तर 2311 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 78,69,591 करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.97 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज पाच कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर 1.84% एवढा झाला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या 14599 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे आणि मुंबईमध्ये आहेत. पुण्यात चार हजार 967 तर मुंबईत एक हजार 865 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याशिवाय ठाणे एक हजार 16, नाशिक 688, अहमदनगर 460, सोलापूर 329 आआणि औरंगाबादमध्ये 314 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात आज दोन हजार 336 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये आढळले आहेत. शनिवारी मुंबईमध्ये 266 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर पुणे मनपा 314, पुणे 145, पिंपरी चिंचवड 198 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मालेगाव मनपा आणि लातूर मनपामध्ये आज कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही.
देशातील स्थिती काय?
देशात गेल्या 24 तासांत 21 हजार 411 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारी दिवसभारत 67 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. भारतात गेल्या 24 तासांत 67 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या दीड लाखांच्या पुढे गेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, 20 हजार 726 कोरोनााबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोना महामारी सुरु झाल्यापासून एकूण 5 लाख 25 हजार 997 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.