Hair Care Tips : सुंदर केस असावे ही सर्वांचीच इच्छा असते, मग ती महिला असो वा पुरुष. प्रत्येकाला आपले केस सुंदर, निरोगी असावेत, असं वाटतं. पण अनेक वेळा आपण आरोग्य आणि केसांकडे दुर्लक्ष करतो, यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. व्यस्त जीवनशैली, धूळ, प्रदूषण यांमुळे केसाचं आरोग्य बिघडतं. त्यामुळे केसांसंबंधित समस्या निर्माण होतात. अशावेळी केसांची अधिक काळजी घेणं गरजेच आहे. यासाठी तुम्ही केमिकलयुक्त प्रोडक्टसपेक्षा आयुर्वेदिक उपायांचा अवलंब केल्यास अधिक फायदा होईल. यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही आणि केसांचं आरोग्यही सुधारेल.
शिकाकाई, रीठा आणि आवळा
केस गळतीच्या समस्येपासून सुटका मिळवायची असेल, तर शिकाकाई, रीठा आणि आवळा फायदेशीर ठरू शकतात. या तिन्ही गोष्टी तुमच्या केसांना भरपूर पोषण देत त्यांना अधिक मजबूत बनवतात. त्यामुळे तुम्हाला केस गळतीच्या समस्येपासून सुटका मिळते आणि केस चमकदारही होतात. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, हे केस गळती रोखण्यात प्रभावी आहे. तर रीठा लोहाचा उत्तम स्त्रोत आहे. यामुळे केसांची वाढ होते.
भृंगराज ठरेल फायदेशीर
केसांसंबंधित समस्यांवर उत्तम आयुर्वेदिक उपाय म्हणजे भृंगराज. याचा वापर केल्याने केस गळतीच्या त्रासापासून सुटका होईल. आयुर्वेदामध्ये भृंगराजचं विशेष महत्त्व सांगण्यात आलं आहे. भृंगराज केसांना योग्य पोषण देत त्यांना अधिक मजबूत करते. शिवाय केसांची वाढ होण्यास मदत करते. एवढंच नाही तर भृंगराज कोंडा टाळण्यासही फायदेशीर आहे. केसांच्या चांगल्या वाढीसाठी, केसांवर भृंगराज तेलाचा वापर करा.
कोरफड केसांसाठी गुणकारी
तुम्हाला त्वचेसाठी कोरफड आणि त्याचे फायदे माहित असतील, पण कोरफड केसांसाठीही तितकीच फायदेशीर आहे. केस गळतीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी कोरफडीचा वापर करा. कोरफडमध्ये असलेले गुणधर्म केसांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रभावी ठरतात. केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी कोरफडीचं जेल केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावा. यामुळे तुमचे केस आतून मजबूत होतील.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :