Health Tips : दूध हा एक असा पदार्थ आहे ज्याचा वापर प्रत्येक घरात केला जातो. अर्थात दुधात फार पोषक तत्व असतात. यामुळे झटपट एनर्जी मिळते. दूध कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. तुम्ही तुमच्या रोजच्या डाएटमध्ये दुधाचा समावेश नक्की केला पाहिजे. पण, तुम्हाला माहित आहे का की काही पदार्थांबरोबर दुधाचे सेवन करू नये. अनेक गोष्टींमध्ये दूध मिसळल्याने फायदा होण्याऐवजी नुकसान होते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या पदार्थांसोबत दुधाचे सेवन करू नये.


दुधासोबत आंबट खाऊ नये - अनेक आंबट पदार्थ दुधासोबत किंवा पिल्यानंतर लगेच खाऊ नयेत. संत्री, द्राक्ष किंवा लिंबू यांसारख्या लिंबूवर्गीय फळांसह दुधाचे सेवन करू नये. याशिवाय दुधासोबत मुळा खाऊ नये. किंवा मुळा खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नये. त्यामुळे त्वचेचे आजार होतात.


दह्यासोबत दूध पिऊ नका - दूध आणि दही दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, परंतु दोन्ही गोष्टी एकत्र सेवन करू नये. दूध आणि दही एकत्र खाल्ल्याने शरीराला हानी पोहोचते. दोन पदार्थांमध्ये सुमारे 4-5 तासांचे अंतर असावे.


दुधासोबत मासे खाऊ नये - दुधासोबत मासे खाणे हानीकारक आहे हे बहुतेकांना माहीत आहे. दोन पदार्थांमध्ये थोडा विलंब असावा. दूध थंड आणि मासे गरम. त्यामुळे दोन्ही एकत्र सेवन करणे चांगले नाही. यामुळे तुम्हाला त्वचेची ऍलर्जी होऊ शकते.


कारले आणि फणस दुधासोबत खाऊ नये - कारले आणि फणस खाल्ल्यानंतर लगेच दूध प्यायल्यास त्वचा संक्रमण, नागीण, खरुज, खाज सुटणे, शरीरात इसब होऊ शकतो. कारले आणि फणसाची भाजी दुधासोबत खाणे टाळावे. दोन्ही गोष्टींमध्ये किमान 2-3 तासांचे अंतर ठेवा.


टरबूजाबरोबर दूध घेऊ नये - फळांसोबतही दुधाचे सेवन करू नये. विशेषत: टरबूजसोबत दूध पिऊ नका. या गोष्टींचे दुधासोबत सेवन केल्यास शरीराला हानी पोहोचते. तसेच, दोन्ही गोष्टी स्वतंत्रपणे खाल्ल्यास खूप फायदा होतो.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :