Hip Bone Symptoms : बदलत्या जीवनशैलीनुसार शरीराकडे, त्वचेकडे, शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणे सहसा होत नाही. अचानक उद्भवणारे हे आजार आपल्याला माहीतही नसतात. आणि त्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु, हेच दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. त्यातलाच एक होणारा त्रास म्हणजे हिप बोन (Hip Bone). तुम्हाला प्रश्न पडला असेल की हिप बोन म्हणजे नेमकं काय? तर सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास हिप बोन म्हणजे कमरेच्या हाडांना होणारा त्रास. या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या. 


हिप बोन म्हणजे नेमकं काय?


हिप बोन म्हणजे कमरेच्या हाडांना होणारा त्रास. विशेष म्हणजे हा त्रास आपल्याला रोज जाणवत नाही तर, अचानक शरीराच्या एका विशिष्ट भागात तणाव जाणवतो. हिप बोनचा त्रास सांध्यांमध्ये जास्त जाणवतो. अधिकतर हा त्रास स्नायू आणि हाडांवर जास्त दबाव आल्यामुळे होतो. 


हिप बोनचा त्रास कशामुळे होतो? 



  • ठराविक वेळेनंतर अधिक तास काम करणे.

  • एकाच स्थितीत बराच वेळ राहणे. 

  • बदलती जीवनशैली हे एक प्रमुख कारण आहे.  

  • कॅल्शियमची कमतरता.


महिला आणि पुरुष दोघांनाही ही समस्या जाणवू शकते 


हिप बोनचा त्रास महिला आणि पुरुष दोघांनाही होऊ शकतो. परंतु, सहसा ही समस्या महिलांमध्ये अधिक असते. एकाच स्थितीत बराच वेळ उभे राहणे किंवा बराच वेळ बसणे हे देखील दुष्परिणाम होऊ शकतात. हिप दुखणे हे अनेक गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. वयाच्या चाळीशीनंतर महिलांची चयापचय क्रिया झपाट्याने कमी होते. त्यामुळे त्यांच्या हाडांची घनता कमी होऊ लागते. अशा वेळी ही समस्या जाणवते. यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 


राज ठाकरे यांनाही हिप बोनचा त्रास 


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही हिप बोनचा त्रास आहे. येत्या 1 जूनला त्यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया होणार आहे. अशी माहिती राज ठाकरे यांनी सभेच्या दरम्यान दिली. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :