एक्स्प्लोर

Tulsi Leaves : तुळशीची पानं अनेक रोगांवर रामबाण उपाय; 'या' पद्धतीने वापर करा

Tulsi Leaves Benefits : जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन केले तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहाल.

Tulsi Leaves Benefits : तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. प्रत्येक घराच्या अंगणात तुळस लावली जाते. तिची पूजा केली जाते. तुळशीचे रोप (Tulsi Leaves) फायदेशीर मानले जाते. आयुर्वेदात तुळशीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. तुळशीचा वापर करून अनेक लहान-मोठे आजार बरे करता येतात. आयुर्वेदानुसार तुळशीच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीवायरल, अँटी फंगल असे गुणधर्म असतात. यामुळे शरीरातील अनेक समस्या दूर होतात. तुळशीची पाने पोटासाठी गुणकारी असतात. पोटात जळजळ, अपचन, ऍसिडिटी यांसारख्या पोटाच्या समस्या असतील तर त्या तुळशीमुळे दूर करता येतात. तुळशीची पाने देखील पीएच पातळी राखण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. या ठिकाणी आम्ही तुम्हाला तुळशीची पानं अनेक रोगांवर कशी गुणकारी आहेत हे सांगणार आहोत. चला जाणून घेऊया तुळशीचे फायदे काय आहेत.
 
थंडीपासून संरक्षण 

तुळशीची पाने हिवाळ्याच्या त्रासापासून वाचवू शकतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने चघळल्यास सर्दी-खोकल्यासारख्या समस्या होणार नाहीत. घसा खवखवणे, घसा दुखणे यांसारख्या समस्यांपासूनही सुटका मिळते.
 
हृदयाचे आरोग्य राखणे

तुळशीच्या पानांना हृदयाच्या आरोग्याचा खजिना म्हटले जाते, मग तेही कमी नाही. रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. आणि हृदय नेहमी सुरक्षित राहते. तुळशीच्या पानांमुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयविकाराच्या झटक्यासारखे आजार दूर राहतात.
 
पोटाच्या समस्या दूर होतील

रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या दूर राहतील. पचनक्रिया सुरळीत राहते आणि पोटाची सूजही कमी होते. इतकंच नाही तर ही पाने तुम्हाला अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, अपचन, आंबट ढेकर यांसारख्या समस्यांपासूनही आराम देतात.
 
त्वचेची काळजी घ्या

रोज सकाळी तुळशीची पाने चघळल्याने त्वचा तजेलदार होते. तुळशीच्या पानांमध्ये आढळणारे अँटीबैक्टीरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म त्वचेत खोलवर जाऊन ते स्वच्छ करतात. मुरुम देखील येणं बंद होतं. 
 
दुर्गंधीपासून मुक्त होणे

श्वासात दुर्गंधी येत असेल तर तुळशीची पाने नियमित घ्या. यामध्ये आढळणारे गुणधर्म तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करून श्वासाची दुर्गंधी कमी करतात.

कर्करोग टाळण्यास मदत होते

तुळशीची पाने कॅन्सरसारख्या भयंकर रोगापासून बचाव करण्याचे काम करतात. दररोज तुळशीची चार पाने खाल्ल्याने त्वचा, यकृत, तोंड आणि फुफ्फुसाचा कर्करोग टाळण्यास मदत होते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Embed widget