एक्स्प्लोर

Health Tips : चालणे की धावणे? आरोग्यासाठी जास्त काय फायदेशीर? वाचा सविस्तर

Health Tips : आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी चालणे चांगले आहे. यामुळे तुमचे शरीर सक्रिय राहते

Health Tips : आपल्याला जर नेहमी निरोगी राहायचं असेल तर त्यासाठी व्यायाम करण्याची गरज आहे. चांगला आहार घेण्याची गरज आहे. अनेकदा आरोग्य तज्ज्ञ आपल्याला शारिरीक हालचाली करण्यास सांगतात. यासाठी तुम्ही जर सर्वात सोप्या व्यायामाचा विचार केला तर चालणे आणि धावणे हे व्यायाम सर्वात आधी डोळ्यांसमोर येतात. नियमित धावणे किंवा चालणे याद्वारे तुम्ही स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवू शकता. पण जेव्हा या दोघांमध्ये शरीरासाठी नेमकं चांगलं काय याचा विचार केला जातो तेव्हा लोक गोंधळतात. या ठिकाणी आम्ही तुम्हाला फिटनेसच्या दृष्टीने दोन्ही व्यायाम सर्वोत्तम आहेत. मात्र, त्यांचे आरोग्यावर वेगवेगळे परिणाम होतात ते कसे? चालणे आणि धावण्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत? या संदर्भात अधिक माहिती सांगणार आहोत.
 
चालण्याचे फायदे  

आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी चालणे चांगले आहे. यामुळे तुमचे शरीर सक्रिय राहते आणि अन्नाचे पचन व्यवस्थित होते. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी सतत चालावे. ताणतणाव, चिंता, झोप न लागणे, एकाग्रता नसणे इत्यादी गोष्टी यामुळे दूर होतात. आजारी आणि वृद्ध व्यक्ती जे जास्त व्यायाम करू शकत नाहीत त्यांना चालण्यामुळे आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. चालण्याचा एक फायदा म्हणजे हा व्यायाम तुम्ही कोणत्याही वयात करू शकता. चालण्याने रक्तदाबही नियंत्रित राहतो आणि डोळ्यांसाठीही फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. 
 
धावण्याचे फायदे   

चालण्याप्रमाणेच धावण्याचेही अनेक फायदे आहेत. सध्या जगभरात लठ्ठपणाचे प्रमाण फारच वाढत चालले आहे. अशा वेळी वजन कमी करण्यासाठी धावणे हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. धावण्याने भरपूर कॅलरी आणि फॅट बर्न होते आणि त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. तर, धावण्याने शरीरातील रक्ताभिसरण वाढते आणि स्नायू मजबूत होतात. हृदय निरोगी ठेवण्यासाठी धावणे हा एक चांगला व्यायाम असल्याचे सिद्ध होते. यासाठी चालणे आणि धावणे हे दोन्ही व्यायाम आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचेच आहेत. मात्र, तुम्ही तुमच्या सोयीनुसार योग्य व्यायम पद्धत निवडणं गरजेचं आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Pregnancy Tips : गर्भधारणेदरम्यान तणावामुळे मुलामध्ये ADHD चा वाढता धोका; गर्भवती महिला 'या' मार्गांनी तणाव कमी करू शकतात

महत्त्वाच्या बातम्या

Diabetes Diet Tips : डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 
डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 
FSSAI School Food Guidelines : शालेय विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत FSSAI नवा फॉर्म्युला; कँटिनमधील पदार्थांमधील हाय शुगर, फॅट अन् सॉल्टसाठी मर्यादा निश्चित
शालेय विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत FSSAI नवा फॉर्म्युला; कँटिनमधील पदार्थांमधील हाय शुगर, फॅट अन् सॉल्टसाठी मर्यादा निश्चित
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Embed widget