एक्स्प्लोर

Health Tips : केवळ वजन कमी करणंच नाही तर ते वाढवणंही गरजेचं; स्लिम होण्यासाठी 'हे' उपाय करा

Health Tips : वजन कमी करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच वजन वाढवणेही महत्त्वाचे आहे.

Health Tips : आजकाल बहुतेक लोक आपल्या वाढत्या वजनामुळे त्रस्त असतात. बिघडलेली जीवनशैली आणि आहारामुळे अनेक लोक लठ्ठ होत आहेत. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी लोक अनेक प्रकारे प्रयत्न करतात. काही जण जिमला जातात, तर काही नियमित आहाराचं पालन करतात. पण आपल्यामध्ये असे अनेक आहेत जे आपल्या बारीक शरीरामुळे त्रस्त आहेत. वजन वाढवण्यासाठी, आहारात उच्च कॅलरीयुक्त अन्न समाविष्ट करणे चांगले आहे.

पण तुमचे वजन का कमी होत आहे हे समजून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. याचं मुख्य कारणे म्हणजे कोणत्याही आजारातून बरे होणे किंवा वाढत्या वयानुसार वजन कमी होणे. जर तुम्हाला तुमचे वजन हेल्दी पद्धतीने वाढवायचे असेल तर तुम्ही यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. 

वजन कसे वाढवायचे?

निरोगी मार्गाने वजन वाढवण्यासाठी, आपण आपल्या आहाराकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. तुमच्या आहारात उच्च कॅलरीयुक्त पदार्थांचा समावेश करा. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वजन वाढवण्यासाठी आवश्यकतेपेक्षा 300-500 जास्त कॅलरी वापरल्या पाहिजेत. उच्च उष्मांकयुक्त पदार्थांमध्ये चरबी आणि प्रथिनांचे प्रमाण वाढवा.

जंक फूड खाऊ नका

वजन लवकर वाढवण्यासाठी अस्वास्थ्यकर चरबीयुक्त पदार्थ आणि जंक फूड खाऊ नका. अशा प्रकारच्या अन्नाचं सेवन केल्याने तुमच्या पोटाचा भाग वाढतो. याशिवाय, हे आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे भविष्यात मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयाशी संबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. वजन वाढवण्यासाठी तांदूळ, दूध, ड्रायफ्रूट्स यांचा आहारात समावेश करा.

झोप देखील महत्वाची आहे

वजन वाढवण्यासाठी आहार आणि व्यायामाबरोबरच पुरेशी झोपही महत्त्वाची आहे. त्यामुळे दिवसातून किमान 7 ते 8 तास झोप घेण्याचा प्रयत्न करा. शिवाय, ते तुमच्या मानसिक विकासासाठी देखील चांगले राहील. याबरोबरच वर्कआउट्सही करायला हवेत. जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुम्हाला अधिक भूक लागते. ज्यामुळे तुम्ही अधिक अन्न खाता.  यामुळे तुमचे वजन हेल्दी पद्धतीने वाढू शकते. या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं वजन नक्की वाढेल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी

महत्त्वाच्या बातम्या

Breastfeeding Awareness week: स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
Annual Health Checkup Benefits : वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget