Health Tips : 'या' मार्गांनी तणावाला करा बाय बाय! मेंदू डिटॉक्स करण्यासाठी फॉलो करा सोपा उपाय
Health Tips : तुमच्या आयुष्यातील काही संस्मरणीय क्षण तुम्ही तुमच्या डायरीत लिहू शकता.
![Health Tips : 'या' मार्गांनी तणावाला करा बाय बाय! मेंदू डिटॉक्स करण्यासाठी फॉलो करा सोपा उपाय Health Tips how to detox brain every morning marathi news Health Tips : 'या' मार्गांनी तणावाला करा बाय बाय! मेंदू डिटॉक्स करण्यासाठी फॉलो करा सोपा उपाय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/30/3a807ba47d8f593bb9e1492d71e899d41703945764583358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Health Tips : निरोगी राहण्यासाठी केवळ शरीरालाच डिटॉक्सची गरज नाही, तर तुम्हाला वेळोवेळी तुमच्या मनालाही डिटॉक्स करण्याची गरज आहे. आजच्या व्यस्त जीवनशैलीत मन निरोगी ठेवण्याची विशेष गरज आहे. वाईट जीवनशैलीमुळे आपल्या मनावर सर्वात जास्त परिणाम होतो. यासाठी तुम्ही सकाळी उठल्याबरोबर तुमचे मन डिटॉक्स करू शकता. मन डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.
सकाळी व्यायाम करा
दररोज सकाळी उठल्याबरोबर व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायाम केल्याने आपल्या शरीरात सेरोटोनिन नावाचा हार्मोन बाहेर पडतो, ज्याला आपण हॅपी हार्मोन देखील म्हणतो. मन डिटॉक्स करण्यासाठी सकाळी व्यायामासाठी शांत खोली निवडा. व्यायाम दररोज ठराविक वेळेत करा.
डायरी ठेवा
तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही अविस्मरणीय क्षण तुम्ही तुमच्या डायरीत लिहू शकता. यामुळे तुमचे मन रिलॅक्स होते आणि तुम्हाला खूप फ्रेश वाटते. या डायरीमध्ये तुम्ही रोज काय करता आणि तुमचा दिवस कसा होता हे देखील लिहू शकता. डायरी लिहून तुम्ही तुमचे विचार चांगल्या प्रकारे मांडू शकाल. तुम्ही तुमच्या डायरीत अशा गोष्टीही लिहू शकता ज्या आपण सहसा कोणालाही सांगू शकत नाही.
ध्यान करा
ध्यान केल्याने मन एकाग्र होण्यास मदत होते. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही सकाळी काही वेळ ध्यान करा. यासाठी तुम्ही शांत जागा निवडा. यानंतर, डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या आणि मन शांत करण्यावर लक्ष केंद्रित करा. त्याचे फायदे तुम्हाला एका दिवसात दिसणार नाहीत, यासाठी तुम्हाला दररोज ध्यान नियमितपणे करावे लागेल.
मोबाईलपासून दूर राहा
सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरण्याची चूक जवळपास सर्वच जण करतात. लोकांना असे वाटते की, यामुळे त्यांचे नुकसान होणार नाही. तर, सकाळी उठल्याबरोबर मोबाईलचा वापर केल्याने त्याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर होतो. खरंतर, लोकांना सकाळी उठल्याबरोबर त्यांचे ई-मेल आणि मेसेज तपासण्याची वाईट सवय असते. पण झोपेतून उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोळ्यांवर आणि मेंदूवर परिणाम होतो. म्हणूनच, सकाळी उठल्याबरोबर तुमचा मोबाईल वापरण्याऐवजी, आरोग्यदायी क्रिया करून तुमच्या जीवनशैलीचा एक भाग बनवा.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Health Tips : सेलिब्रेशननंतर थोडा हलका आणि निरोगी नाश्ता हवाय? 'ही' रेसिपी वापरून पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)