(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : हायपरटेन्शनमुळे जीव जाण्याचा धोका? वेळीच 'ही' लक्षणं ओळखा, अन्यथा...
Health Tips : उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.
Health Tips : रक्तदाब (Blood Pressure) अचानक वाढल्यामुळे रक्तदाबाच्या रूग्णांमध्ये हायपरटेन्शनची भावना जास्त तीव्रतेने वाढते. अशा वेळी रक्त पंप करण्यासाठी शरीराला खूप मेहनत करावी लागते. रक्त पंपावरील दाब वाढल्याने हृदयाचे स्नायू कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह मंदा व्हायला लागतो. शरीरात ऑक्सिजनची कमतरता देखील आहे. त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही (Heart Attack) वाढतो. अशा वेळी उच्च रक्तदाबाच्या रुग्णाने काही विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. उच्च रक्तदाब जीवघेणा का आहे? तसेच त्याची लक्षणे काय आहेत? याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
उच्च रक्तदाब जास्त धोकादायक का आहे?
उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. या काळात मेंदूतील रक्तप्रवाह कमी होऊ लागतो. त्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. अनेकांना माहीत नसेल पण, ब्रेन स्ट्रोकचे दोन प्रकार आहेत? पहिला म्हणजे इस्केमिक स्ट्रोक आणि दुसरा म्हणजे हेमोरेजिक स्ट्रोक. उच्च रक्तदाबाच्या रुग्णाचा रक्तदाब अचानक लक्षणीय वाढतो. त्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. हायपरटेन्शनला सायलेंट किलर (Silent Killer) असेही म्हणतात. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, 30 टक्के लोकांना हायपरटेन्शनबद्दल माहिती नसते कारण त्याची लक्षणे अगदी सामान्य असतात.
हायपरटेन्शनची सामान्य लक्षणे कोणती आहेत?
- श्वास घेण्यास त्रास होणे
- छातीत दुखणे आणि अस्वस्थता जाणवणे
- डोक्यात जडपणा किंवा सतत वेदना होणे
- छातीत सतत धडधडणे
- डोळ्यांची जळजळ आणि वेदना होणे
- शौचालयात अडचण निर्माण होणे
हायपरटेन्शन कसे नियंत्रित करावे?
- जर तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर वेळोवेळी तपासत राहा.
- निरोगी जीवनशैलीचे अनुसरण करा
- दररोज व्यायाम करा
- 8 तास झोपण्याची खात्री करा.
- दररोज फळे आणि भाज्यांचं सेवन करा.
- जास्त मद्यपान पिऊ नका
- 3-4 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे
- रोज अर्धा तास व्यायाम करा
जर तुम्हाला उच्च रक्तदाब, तसेच हायपरटेन्शची समस्या जाणवत असेल तर यावर वेळीच डॉक्टरांच्या सल्लाने औषधं घेणं गरजेचं आहे. तसेच, जीवनशैलीत काही बदल करून तुम्ही उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन सारख्या समस्यांवर मात करू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :