(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : स्ट्रेच मार्क्समुळे हैराण आहात? 'हे' घरगुती उपाय करा, काही दिवसांतच फरक दिसेल
Health Tips : काही लोकांचं जेव्हा वजन वाढतं आणि त्यानंतर ते जेव्हा वेट लॉस करतात तेव्हा त्यांच्या शरीरावर अशा प्रकारचे स्ट्रेच मार्क्स दिसतात.
Health Tips : आपल्या शरीरावर असे काही निशाण असतात जे आपल्याला कितीही घालवण्याची इच्छा असली तरी ते जात नाहीत. हे निशाण शरीरावर दिसल्याने फार विचित्र वाटू लागते. स्ट्रेच मार्क्स (Strecth Marks) हा यापैकीच एक आहे. काही लोकांचं जेव्हा वजन वाढतं आणि त्यानंतर ते जेव्हा वेट लॉस (Weight Loss Tips) करतात तेव्हा त्यांच्या शरीरावर अशा प्रकारचे स्ट्रेच मार्क्स दिसतात. तसेच, गर्भवती महिलांमध्ये (Pregnant Women) देखील ही समस्या दिसून येते. स्ट्रेच मार्क्समुळे अनेकदा महिलांना त्यांच्या आवडीचे कपडे घालता येत नाहीत. इतकंच काय तर साडी नेसतानाही महिलांच्या शरीरावर हे स्ट्रेच मार्क्स अगदी स्पष्ट दिसतात.
या स्ट्रेच मार्क्सना घालवण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. मात्र, याचा शरीरावर फारसा परिणाम दिसून येत नाही. काही लोकांच्या त्वचेवर स्ट्रेच मार्क्स घालवण्याची क्रिम सूट करत नाही. आणि यामुळेच अनेकदा त्यांना अॅलर्जी होते. यासाठी तुम्ही तुमच्या घरीच उपलब्ध असलेल्या काही घरगुती उपायांचा वापर करू शकता. हे घरगुती उपाय नेमके कोणते या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
बदामापासून नॅचरल स्क्रब तयार करा.
स्ट्रेच मार्क्सला कमी करण्यासाठी तुम्ही बदामाचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला एका बाऊलमध्ये बदामाची पावडर, साखर, कॉफी, खोबरेल तेल एकत्र घेऊन मिक्स करायचं आहे. याची चांगली पेस्ट तयार करून घ्या. या पेस्टला रोज अंघोळीपूर्वी स्ट्रेच मार्क्सवर लावा. काही दिवसांतच तुम्हाला फरक दिसेल.
बटाट्याच्या रसाचा 'असा' वापर करा
बटाट्याच्या रसाचा वापर शरीरावरील डाग घालवण्यासाठी केला जातो. बटाटा हा ब्लीचिंग करण्याचं काम करतो. तुम्हाला जर शरीरावरील स्ट्रेच मार्क्स घालवायचे असतील तर यासाठी एक चमचा बटाट्याच्या रसामध्ये एलोवेरा जेल मिक्स करून स्ट्रेच मार्क्स असलेल्या ठिकाणी लावा. तुम्ही ही पेस्ट रोज लावली तर काही दिवसांतच हळूहळू शरीरावरील डाग कमी होतील.
लिंबाची साल गुणकारी
लिंबाच्या सालीपासून तयार करण्यात येणाऱ्या पावडरचा वापर अनेक ब्युटी प्रोडक्ट्ससाठी केला जातो. शरीरावरील डागांना कमी करण्यासाठी हा अतिशय गुणकारी उपाय आहे. शरीरावरील स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी तुम्ही लिंबाच्या सालीची पावडरचा वापर करू शकता. यासाठी लेमन पील पावडरमध्ये एक चमचा मध मिक्स करा. ही पेस्ट हलक्या हाताने स्ट्रेच मार्क्स असलेल्या ठिकाणी लावून स्क्रब करा.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.