(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : जास्त पाणी प्यायल्यानेही शरीराचं नुकसान होतं; जाणून घ्या ओव्हरहायड्रेशनचे 4 दुष्परिणाम
Health Tips : जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडते आणि रक्तातील सोडियमची पातळी कमी होऊ शकते.
Health Tips : कोणत्याही गोष्टीचा अतिरेक जीवनात विषासारखा बनतो. पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याचे संतुलन राखले जाते आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. मात्र, इतर गोष्टींप्रमाणेच पाण्याच्या अतिसेवनाचाही शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. या संदर्भात आहारतज्ज्ञ असे सांगतात की, आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने रक्ताचे प्रमाण वाढते आणि जास्त पाणी फिल्टर करण्यासाठी किडनीवर दबावही वाढतो. यामुळे हृदयावर अधिक भार पडू शकतो आणि पोटात जळजळ वाढू शकते.
जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाईट संतुलन बिघडू शकते आणि रक्तातील सोडियमची पातळी कमी होते, ज्यामुळे हायपोनेट्रेमिया नावाची स्थिती निर्माण होते. हायपोनेट्रेमियाच्या लक्षणांमध्ये मळमळ, डोकेदुखी, अशक्तपणा, चिडचिड, स्नायू पेटके इ. समस्या निर्माण होण्याची भीती असते.
एका दिवसात किती पाणी पिण्यास पुरेसे आहे?
इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनने पिण्याच्या पाण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे स्थापित केली आहेत. निरोगी व्यक्तीने दररोज सुमारे 9 ते 13 कप पाणी प्यावे.
जास्त पाणी पिण्याचे 4 दुष्परिणाम
1. हायपोनाट्रेमिया
जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील सोडियमची पातळी कमी होऊ शकते. या स्थितीलाच हायपोनेट्रेमिया म्हणतात. हृदय आणि मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्या लोकांना हायपोनेट्रेमियाचा धोका जास्त असतो.
2. स्नायूंमध्ये जळजळ
BMJ मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की जास्त पाणी प्यायल्याने रक्तातील सोडियम आणि इतर इलेक्ट्रोलाईट्स पातळ होतात, ज्यामुळे शरीरातील सोडियमची पातळी कमी होते. शरीरात सोडियमचे प्रमाण कमी असल्याने स्नायूंमध्ये क्रॅम्पसारख्या शारीरिक समस्या उद्भवू शकतात.
3. वारंवार लघवी होणे
जास्त पाणी प्यायल्याने लघवी जास्त होते. कारण जास्त पाणी प्यायल्यावर किडनीला सतत काम करावे लागते. तसेच, अभ्यासातून असे दिसून आले आहे की वारंवार लघवी केल्याने किडनीवर जास्त ताण पडतो.
4. अतिसार
ओव्हरहायड्रेशनमुळे हायपोक्लेमिया होतो किंवा शरीरातील पोटॅशियमची पातळी कमी होते. यामुळे खूप वेळ जुलाब आणि घाम येणे. क्लीव्हलँड क्लिनिकच्या वेबसाइटवरील अहवालानुसार, हायपोक्लेमिया बहुतेकदा पाचन तंत्रावर थेट परिणाम करते. त्यामुळेच उलट्या, जुलाब अशा समस्या उद्भवतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :