Health Tips : सध्या महाराष्ट्रासह भारतात डेंग्युच्या (Dengue) रूग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. डेंग्यू हा एक फ्लूसारखा आजार आहे. जो इडिस डासामुळे पसरतो. डेंग्युमध्ये आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. तसेच वेळेवर उपचार न केल्यास हा आजार अधिक पसरू शकतो.   


डेंग्यूमध्ये झपाट्याने प्लेटलेट्स कमी होणं कधीकधी जीवघेणं ठरतं. जर तुम्हाला डेंग्यू झाला असेल तर शरीरात खूप अशक्तपणा येतो. यासाठी खाण्यापिण्याची खूप काळजी घेणे गरजेचे आहे. या ठिकाणी डेंग्युमधून बरे झाल्यावर आपला डाएट कसा असावा या संदर्भात आम्ही माहिती सांगणार आहोत.  


काही डाएट टिप्स : 


1. भरपूर पाणी प्या : डेंग्यू तापात रुग्णाच्या शरीरात पाण्याची कमतरता जास्त भासते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या. यामुळे तुमच्या शरीराला जास्त ऊर्जा मिळेल. पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी ताज्या फळांचा रस, भाज्यांचे सूप, नारळ पाणी, डाळिंबाचा रस आणि अननसाचा रस प्या. डेंग्यूमधील अशक्तपणा दूर करण्यासाठी रिहायड्रेशन खूप मदत करते. 


2. हिरव्या पालेभाज्या खा :  डेंग्यूच्या तापात हिरव्या पालेभाज्या जास्त खाव्यात. जर तुम्हाला भाजीची चव आवडत नसेल तर तुम्ही सूप बनवून पिऊ शकता. याशिवाय भाज्यांचे सॅलड करूनदेखील तुम्ही खाऊ शकता. यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे देखील मिळू शकतील. 


3. आहारात पौष्टिक गोष्टींचा समावेश करा : शरीरातील अशक्तपणा दूर करण्यात आहाराची भूमिका खूप महत्त्वाची असते. डेंग्यूमुळे रुग्णाला भूक कमी लागते. या स्थितीत पचनसंस्था मंदावते. त्यामुळे पौष्टिक आणि सहज पचणारा आहार घ्या. रुग्णाला भाजीची खिचडी, डाळ आणि मसूर खायला द्या. अन्नाला चव आणण्यासाठी लसूण, आलं आणि लिंबू यांसारख्या गोष्टींचा वापर करा. 


4. बाहेरचे अन्न टाळा : जर तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर तुम्ही बाहेरचे अन्न खाणे टाळावे. डेंग्यूमध्ये पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक्स किंवा इतर कोणतेही बाहेरचे अन्न खाऊ नये. तसेच बाजारात मिळणाऱ्या पॅकेज्ड वस्तूंचा वापर टाळावा. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :