Health News : आपण बहुतेक वेळा कोणतेही पदार्थ खाताना किंवा पिताना त्या बाबात अधिक काही विचार न करता त्या पदार्थाचं सेवन करतो. यामध्ये आपण बहुतेक वेळा आहारात अशा अनेक पदार्थांचा समावेश करतो, जे आरोग्यासाठी घातक ठरु शकतात. इतकंच नाही तर तुमचं आयुष्यही काही मिनिटांनी कमी होईल. बाजारात उपलब्ध सर्वच पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर असतात असं नाही. आपण बहुतेकदा फास्ट फूडचं सेवन करतो. पिझ्झा, बर्गर अनेक जण ताव मारुन खातात. पण हे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरु शकतो.


कोणत्यां पदार्थांमुळे आयुष्य कमी होईल?


मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिशिगन युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांच्या मते, काही पदार्थ खाल्ल्याने आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. संशोधनात असे दिसून आले आहे की, आपण अशा अनेक गोष्टीचं सेवन करतो, जे आरोग्यासाठी हानिकारक असून त्यामुळे तुमचं आयुष्य कमी होतं. अशा परिस्थितीत जर तुम्ही या गोष्टी रोज खाल्ले तर तुमचं वय अनेक मिनिटं, तास आणि वर्षे कमी होऊ शकतं. इतकेच नाही तर अशा काही गोष्टी आहेत, ज्यामुळे आपलं वयही वाढतं.


अनेक गोष्टींची यादी जाहीर


संशोधनातील अनेक गोष्टींची यादी जाहीर करण्यात आली आहे. नेचर फूड या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, चांगल्या दर्जाच्या खाद्यपदार्थांच्या सेवनामुळे आपलं वय वाढतं. तसेच निकृष्ट दर्जाच्या वस्तूंचे सेवन केल्याने आपलं आयुष्य कमी होतं.


'या' पदार्थांमुळे वय होईल कमी


सॉफ्ट ड्रिंक - 12.4 मिनिटं


चीज बर्गर - 8.8 मिनिटं


पिझ्झा - 7.8 मिनिटं


हॉट डॉग - 36 मिनिटं


प्रक्रिया केलेलं मांस - 26 मिनिटं


कोणते पदार्थ वय वाढवतात?


पीनट बटर - 33. 1 मिनिटं


टोमॅटो - 3.8 मिनिटं


एवोकॅडो - 1.5 मिनिटं


सॅल्मन फिश - 13 मिनिटं


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :