Swine flu in Mumbai : मुंबईमध्ये (Mumbai) एकीकडे कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव थांबताना दिसत नाहीय, तर दुसरीकडे स्वाईन फ्लू (Swine Flu), डेंग्यू (Dengue) आणि मलेरियासारखे (Malaria) रोगही हातपाय पसरताना दिसत आहे. पावसामुळे मुंबईत डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यातच आता मुंबईत स्वाईन फ्लूचा धोकाही वाढताना दिसत आहे. मुंबईमध्ये स्वाईन फ्लू, डेंग्यू आणि मलेरिया आणि लेप्टो या सारख्या आजारांमुळे आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईमध्ये साथीच्या आजारांचा धोका वाढताना दिसत आहे. पावसामुळे साथीच्या रोगांचं प्रमाण वाढलं आहे. मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये (Cooper Hospital) साथीच्या आजारांसाठी वेगळा ओपीडी (OPD) तयार करण्यात आला आहे. यावर्षी आतापर्यंत स्वाईन फ्लूच्या 163 रुग्णांची नोंद झाली आहे. तर डेंग्यूचे 105 रुग्ण मलेरियाचे 509 रुग्ण आणि लेप्टोच्या 46 रुग्णांची नोंद झाली आहे.
स्वाईन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू
मुंबईत स्वाईन फ्लू, डेंग्यू आणि मलेरिया आणि लेप्टो या सारख्या आजारांमुळे आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू स्वाईन फ्लूमुळे झाला आहे. तीन वर्षात पहिल्यांदाच मुंबईमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांचा मृत्यू झाल्याचं आढळून आलं आहे. कूपर हॉस्पिटलच्या (Cooper Hospital) मेडिसिन विभागाच्या अध्यक्ष डॉ. नीलम रेडकर यांनी एबीपी न्यूजला माहिती देताना सांगितलं आहे की, मुंबईत स्वाईन फ्लू, डेंग्यू आणि मलेरिया आणि लेप्टो या सारखे आजार बळावताना दिसत आहेत. वाढत्या रुग्णांमुळे डॉक्टरांना ट्रेनिंग दिली जात आहे. डेंग्यू आणि मलेरियामुळे रुग्णालयात दररोज सुमारे 15 ते 20 रुग्ण भरती होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.
सर्दी, तापाचा संसर्ग वाढतोय
कूपर हॉस्पिटलचे डीन डॉ. शैलेश मोहिते यांनी सांगितलं की, दररोज सर्दी किंवा तापामुळे आजारी असणारे अनेक रुग्ण दाखल केले जात आहेत. रुग्णालयात लोकांसाठी पूर्ण सेवा उपलब्ध करुन ठेवण्यात आली आहे. कूपर रुग्णालयात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी 5 जणांची प्रकृती गंभीर होती. नागरिकांना विनंती आहे की, प्रकृती ठिक नसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
महत्त्वाच्या इतर बातम्या