Taiwan Earthquake : मागील 24 तासांत तैवानला भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. भुकंपाच्या 100 धक्क्यांनी तैवान हादरले आहे. आज(रविवार) 7.2 रिश्टर स्केल तर शनिवारी 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप आला होता. तैवानमधील युजिंग भागात मागील 24 तासांत भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे परिसरातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. भूकंपाची तीव्रता इतकी होती की रस्त्यांना तडे गेले आहेत, पूल कोसळले आहेत. काही ठिकाणी दुकानं पडली आहेत. पूल कोसळले असल्याने काही वाहनंदेखील खाली कोसळल्याची माहिती मिळत आहे. इतकेच नाही तर भूकंपाच्या धक्क्यानं रुळावर असणारी रेल्वेही हालली... याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
तैवानमधील भूकंपाची तीव्रता प्रंचड होती. यामध्ये अद्याप जिवितहानी झाल्याचं वृत्त नाही. पण अनेक ठिकाणी नुकास झालेय. रस्त्याला तडे गेलेत. घरं कोसळली आहेत.. ट्रेन खेळण्यातील ट्रेनसारखी हालतानाही दिसत आहे. तैवानमधील या आपत्तीचे व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
संपूर्ण तैवानमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले असून राजधानीत मोठं नुकसान झालं आहे. काही इमारतींना तडे गेले आहेत. ताइनान आणि काओसंग या ठिकाणी भूकंपाचा जास्त प्रभाव दिसल नाही.