Health Tips : 'या' गोष्टींच्या कमतरते उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याचा धोका; नियंत्रित आणण्यासाठी 'हे' पदार्थ खा
Health Tips : ओमेगा 3 फॅटी अॅसिड बद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. हे एक पोषक तत्व आहे ज्यातून अनेक फायदे मिळतात.
Health Tips : कामाचा वाढता ताण आणि बिघडलेली जीवनशैली (Lifestyle) याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. याच कारणामुळे अनेक लोकांमध्ये उच्च रक्तदाब (High Blood Pressure) आणि हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचा त्रास फक्त ज्येष्ठ लोकांनाच नाही तर तरूणांमध्येही रक्तदाब आणि हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं आहे. असं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. म्हणूनच, हृदयाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी निरोगी आहार आणि व्यायामाचे पालन करणं गरजेचं आहे.
पण तुम्हाला माहित आहे का की, ओमेगा 3 फॅटी अॅसिडच्या कमतरतेमुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. ओमेगा 3 फॅटी अॅसिड हृदयरोग आणि उच्च रक्तदाबासाठी कारणीभूत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अश वेळी या फॅटी ऍसिडबद्दल आणि त्याची शरीरातील कमतरता कशी भरून काढता येईल याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
ओमेगा 3 फॅटी ऍसिड म्हणजे काय?
WebMD नुसार, ते निरोगी फॅटमध्ये गणले जाते. शरीर स्वतः ते बनवू शकत नाही. पण काही पदार्थांच्या मदतीने तुम्ही त्याची कमतरता भरून काढू शकता. हे ओमेगा वनस्पतींमध्ये आढळणाऱ्या अल्फा-लिनोलेनिक ऍसिडसह तीन प्रकारचे असते. docosahexaenoic ऍसिड आणि eicosapentaenoic ऍसिड, हे प्राण्यांच्या अन्नामध्ये आढळतात.
शरीरासाठी आवश्यक
ही फॅटी ऍसिडस् शरीरासाठी खूप महत्त्वाची असतात. मेंदूला निरोगी ठेवण्याबरोबरच, ओमेगा 3 रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास आणि हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतात. याशिवाय यामुळे उच्च रक्तदाबाची समस्याही दूर करता येते.
त्वचेसाठी फायदेशीर
तुमची त्वचा सॉफ्ट आणि ओलसर ठेवण्यासाठी हे फायदेशीर आहे. यासोबतच ते त्वचेला डिहायड्रेट होण्यापासून वाचवते. ते मुरुम येण्यापासून प्रतिबंधित करते. इतकेच नाही तर सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे रक्षण करते.
'या' पदार्थांचं सेवन करा
फ्लॅक्ससीड, सोयाबीन तेल, मोहरी, मेथी दाणे, काळे हरभरे, लाल राजमा, पालक, अक्रोड आणि मासे खाल्ल्याने शरीरात ओमेगा 3 फॅटी ऍसिडची कमतरता भरून काढता येते.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.