मुंबई : बाजारामध्ये अनेक सौंदर्यप्रसाधनं उपलब्ध आहेत. जी वेळोवेळी त्वचेला होणाऱ्या फायद्यांबाबत दावा करत असतात. एवढच नाहीतर त्वचेच्या विविध समस्यांसाठी वेगवेगळी उत्पादनं बाजारात उपलब्ध आहेत. बदलतं वातवरण आणि वाढतं प्रदुषण यांमुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. परंतु, तुम्हाला माहित आहे का? वेगवेगळे प्रोडक्ट्स आपल्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. जाणून घेऊया काही अशा उत्पादनांबाबत जे त्वचेसाठी घातक ठरतात.
- चेहऱ्याची त्वचा फार सेन्सिटिव्ह असते. त्यामुळे चेहऱ्यासाठी साबणाऐवजी फेसवॉशचा वापर करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. साबणामुळे त्वचा शुष्क होते. पण फेसवॉश त्वचेची आद्रता कायम ठेवण्यासाठी मदत करतो.
- हेअर स्प्रेचा वापर केस सेट करण्यासाठी केला जातो. त्यामुळे हेअर स्टाइल व्यवस्थित राहून स्टायलिश लूक मिळण्यास मदत होते. परंतु, हा हेअर स्प्रे स्काल्पसोबतच त्वचेसाठी हानिकारक ठरतो. हेअर स्प्रेमध्ये अल्कोहोल असतं. यामुळे चेहऱ्याची त्वचा कोरडी होते आणि त्वचेवर पिंपल्स आणि जवजळ होण्याची समस्या उद्भवते. तसेच स्काल्प कोरडे होऊन केसांमध्ये कोंड्याच्या समस्येचाही सामना करावा लागतो.
कमी वयातच केस पांढरे?; जाणून घ्या कारणं आणि उपाय!
- साधारणतः त्वचेची आद्रता टिकवून ठेवण्यासाठी लोक बॉडी लोशन लावतात. परंतु, तुम्हाला माहित आहे का?, यामुळे त्वचेची रोमछिद्र बंद होऊ शकतात. ज्यामुळे त्वचेच्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो.
- हिवाळ्यात आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर केला जातो. पण जास्त गरम पाणी त्वचेची आद्रता शोषून घेतं, त्यामुळे त्वचा कोरडी होते. याव्यतिरिक्त यामुळे त्वचा जास्त सीबमचं उत्पादन करते आणि त्वचेवर पिंपल्स येतात.
- नखांचं सौंदर्य वाढविण्यासाठी नेलपेंटचा वापर केला जातो. या नेलपेंटमध्ये अॅलर्जी निर्माण करणारे म्हणजेच, फॉर्मलाडिहाइड आणि अॅसीटेट तत्व असतात. त्यामुळे नखं आणि त्यांच्या आजुबाजूच्या त्वचेला नुकसान पोहोचतं. याव्यतिरिक्त नेलपेंट रिम्हूवरचा वापर करणंही नखांसाठी घातक ठरतं.
हिवाळ्यात बदामाचं सेवन करणं ठरत फायदेशीर; जाणून घ्या फायदे
- शॅम्पू केसांचं सौंदर्य राखण्यासाठी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करतो. परंतु, शॅम्पूमुळे स्काल्प अॅलर्जी किंवा कोरडे होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेव्हा केसांसाईठ शॅम्पूचा वापर करत असाल तेव्हा त्यामध्ये पाणी मिसळून केसांना लावा. त्यामुळे स्काल्पच्या त्वचेला नुकसान होणार नाही.
- हेअर डायमध्ये हानिकारक तत्व असतात. जे त्वचेसाठी घातक ठरू शकतात.
- डिओड्रंटही त्वचेची छिद्र रोखण्याचं काम करतो. ज्यामुळे त्वचेच्या विविध समस्या उद्भवतात.
टिप : सदर उपायाचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करणे फायदेशीर ठरते, ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.
सावधान! त्वचेसाठी 'या' उत्पादनांचा वापर करणं ठरू शकतं घातक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Nov 2019 10:50 AM (IST)
बाजारातल अनेक ब्युटी प्रोडक्ट्स उपलब्ध असतात, जी त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. पण ही केमिकलयुक्त उत्पादनं अनेकदा त्वचेसाठी घातकही ठरतात.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -