Health News : भारतीय तरुणांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढतंय? चिंताजनक अहवाल समोर, 'या' गोष्टी जबाबदार, डॉक्टर सांगतात...
Health News : उच्च कोलेस्टेरॉलची समस्या याआधी वृद्ध लोकांचा आजार मानला जात होता, परंतु अलिकडच्या वर्षांत एक चिंताजनक रेकॉर्ड समोर आला आहे.
Health News : वाढते शहरीकरण, आजचे धकाधकीचे जीवन, त्यात खराब जीवनशैली, खाण्याच्या सवयी, शारीरिक व्यायामाचा अभाव आणि कमी पौष्टिक आहार या गोष्टी सध्या तरुणांमध्ये दिसत आहेत. याचा परिणाम तरुण भारतीयांमध्ये (India) कोलेस्टेरॉलचे (High Cholesterol) प्रमाण वाढत असल्याचं दिसून आलं आहे. उच्च कोलेस्टेरॉलची समस्या याआधी वृद्ध लोकांचा आजार मानला जात होता, परंतु अलिकडच्या वर्षांत एक चिंताजनक रेकॉर्ड समोर आला आहे. ज्यामध्ये तरुण लोकांमध्ये कोलेस्टेरॉलचा वाढता कल दिसून आला आहे. कोलेस्टेरॉल हे हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणाचे कारण असल्याचं समोर आलं आहे.
भारतीय तरुणांमध्ये कोलेस्टेरॉल का वाढतंय?
भारतीय तरुणांमध्ये कोलेस्टेरॉलच्या प्रमाणात वाढ होत असल्याबाबत नवी दिल्लीतील प्रतिष्ठित डॉक्टर सुरणजीत चॅटर्जी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले की, "सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोलेस्टेरॉलचा आजार अगदी लहान वयात, अगदी पौगंडावस्थेतही सुरू होऊ शकतो, परंतु रुग्णांना वयाची 20 वर्षे पूर्ण होईपर्यंत कोणतीही समस्या जाणवत नाही. यामुळेच अनेक तरुण कमी वयातच हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडतात, प्लेकमुळे, जो उच्च कोलेस्ट्रॉलमुळे होतो. डॉक्टर म्हणतात, माझ्याकडे असे अनेक रुग्ण आहेत. जे केवळ 20 वर्षांचे आहेत आणि त्यांच्यामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त आहे. कोलेस्टेरॉलचा आजार तसा यापूर्वी वृद्धांचा आजार मानला जात आहे, परंतु अलीकडच्या काळात एक चिंताजनक रेकॉर्ड समोर आला आहे. ज्यामध्ये तरुण लोकांमध्ये कोलेस्टेरॉलचा वाढता कल दिसून आला आहे. याबाबत सर्वात धक्कादायक गोष्ट अशी की, या आरोग्याच्या समस्येकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. कारण उच्च कोलेस्टेरॉलची लक्षणे लक्षात येण्यासारखी दिसत नाही.
कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?
कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ यकृतामध्ये तयार होतो जो पचनासाठी आवश्यक अनेक हार्मोन्स तयार करतो. उच्च घनता लिपोप्रोटीन (HDL) आणि कमी घनता लिपोप्रोटीन (LDL) यांना LDL म्हणतात. एचडीएल चांगले कोलेस्टेरॉल म्हणून ओळखले जाते आणि ते 50mg/dL किंवा त्याहून अधिक असावे. तुमच्या शरीरातील LDL म्हणजेच वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी केले पाहिजे. LDL कोलेस्टेरॉल 100 mg/dL पेक्षा कमी असावे, विशेषत: भारतीयांसाठी, ज्यांना जगातील इतर लोकसंख्येपेक्षा हृदयविकाराचा धोका जास्त असतो.
कोलेस्टेरॉलची लक्षणे
उच्च कोलेस्टेरॉलची सहसा कोणतीही लक्षणे नसतात परंतु उपचार न केल्यास हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात होऊ शकतो. कोलेस्टेरॉल एक छुपा जोखीम घटक असतो, म्हणूनच तुमचे कोलेस्ट्रॉल नियमितपणे तपासणे खूप महत्वाचे आहे.
तरुणांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याचे कारण काय?
डॉक्टर सांगतात, तरुणांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याचे कारण हे बदलती जीवनशैली आणि आहाराच्या सवयींशी संबंधित आहे. जे तुम्ही तुमच्या बालपणात खाल्लेल्या चिप्सच्या पॅकेटपासून सुरू होते. अलिकडच्या काळात चरबी आणि ट्रान्स फॅट्सने समृद्ध असलेले पदार्थ आणि फास्ट फूडचा ट्रेंड गगनाला भिडला आहे. खराब खाण्याच्या सवयी, खराब जीवनशैली आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉल वाढते. या व्यतिरिक्त कौटुंबिक इतिहास आणि मधुमेह हे देखील याचे कारण असू शकते.
कोलेस्टेरॉलचे निदान
डॉक्टर सांगतात, उच्च कोलेस्टेरॉल हृदयविकारास कारणीभूत ठरू शकते, जरी उच्च पातळी स्वतःच लक्षणे देत नाहीत, म्हणून 20 आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांनी त्यांचे कोलेस्ट्रॉल नियमितपणे तपासले पाहिजे. म्हणूनच 20 आणि त्याहून अधिक वयाच्या तरुणांनी दर पाच वर्षांनी त्यांचे कोलेस्ट्रॉल तपासले पाहिजे, जरी ते तंदुरुस्त दिसत असले तरीही. आणि काही लक्षणे दिसल्यास त्यांची दरवर्षी तपासणी करावी.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या इतर बातम्या :