Health Benefits Of Peanuts: उगाच नाही म्हणत शेंगदाण्याला ‘कच्चा बदाम’, जाणून घ्या याचे फायदे...
Benefits Of Peanuts: दररोज शेंगदाणे खाल्ल्याने तुमच्या शरीराला दूध, बदाम, तूप, मांस आणि अंडी यातील सर्व पोषक तत्वे मिळतात.
Benefits Of Peanuts : शेंगदाणे (Peanuts) शरीरासाठी इतके फायदेशीर आहेत, की त्याला ‘गरिबांचे बदाम’ म्हटले जाते. शेंगदाणे खणायचे अनेक फायदे आहेत. तज्ज्ञांच्या मते, शेंगदाण्यात 25 टक्क्यांहून अधिक प्रथिने असतात. 100 ग्रॅम कच्च्या शेंगदाण्यात, एक लिटर दुधाएवढे प्रथिने आढळतात. दररोज मूठभर शेंगदाणे खाण्याने अनेक आजार दूर राहू शकतात. दररोज शेंगदाणे खाल्ल्याने तुमच्या शरीराला दूध, बदाम, तूप, मांस आणि अंडी यातील सर्व पोषक तत्वे मिळतात. शेंगदाणे कधीही आणि कोणत्याही ऋतूत खाऊ शकता.
हृदयविकाराचा धोका कमी होतो!
शेंगदाण्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस्, फायबर, वनस्पती प्रथिने यांसारखे पोषक घटक असतात, जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त ठरू शकतात. उच्च रक्तदाब हे हृदयविकाराचे कारण असू शकते. अशा स्थितीत शेंगदाण्याचे सेवन केल्यास रक्तदाब कमी होऊन हृदयविकाराचा धोका कमी होतो.
अल्झायमर शक्यता कमी
अल्झायमर हा मेंदूशी संबंधित आजार आहे, ज्याचा स्मरणशक्तीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत नियासिन आणि व्हिटॅमिन-ई युक्त शेंगदाण्यांचे सेवन केल्यास या आजारापासून बचाव होऊ शकतो. शेंगदाण्यामध्ये आढळणारे हे दोन्ही घटक वयोमानानुसार स्मरणशक्तीवर होणारा परिणाम आणि अल्झायमर रोगाचा धोका कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतात.
कोलेस्ट्रॉल कमी होते
आजकाल अनेकांना उच्च कोलेस्ट्रॉलशी संबंधित समस्या आहेत. बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी हे याचे प्रमुख कारण असू शकते. एका संशोधनानुसार, शेंगदाण्यामध्ये असलेले मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करू शकतात. त्यामुळे ज्यांना उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या आहे, त्यांच्यासाठी मर्यादित प्रमाणात शेंगदाणे खाणे फायदेशीर ठरू शकते.
प्रजनन क्षमता वाढवते
शेंगदाणे प्रजनन क्षमता वाढवण्यास देखील फायदेशीर आहेत. विशेषत: ज्या महिलांना गर्भधारणेस त्रास होत आहे, त्यांनी शेंगदाण्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. कारण, शेंगदाण्यामध्ये आढळणारे फॉलिक ऍसिड, लवकर गर्भधारणेला मदत करतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Care: प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी 'व्हिटॅमिन सी' आहे आवश्यक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
- Health Tips : चुकूनही केळी आणि पपई एकत्र खाऊ नका, तब्येतीवर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम
- Belly fat : पोटावरची चरबी कमी करायचीय? मग, ‘या’ दोन फळांपासून नेहमी दूर राहा!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha