एक्स्प्लोर

Health Tips : फळांचा राजा आंबा आहे आरोग्यासाठी गुणकारी, उन्हाळ्यात खाल्ल्याने मिळतात अनेक फायदे

Health Tips : आंबा खाल्ल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होतात, त्यामुळे उन्हाळ्यात प्रत्येकाने आंबा खाल्लाच पाहिजे.

Health Tips : जसजसा उन्हाळा जवळ आला की सगळ्यांना चाहूल लागते ती आंब्यांची. फळांचा राजा असणाऱ्या आंब्याची सगळेजण वर्षभर आतुरतेने वाट पाहतात. आंबा हा प्रत्येकालाच आवडतो. म्हणून तर तो फळांचा राजा आहे. आंबा खाल्ल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होतात, त्यामुळे उन्हाळ्यात प्रत्येकाने आंबा खाल्लाच पाहिजे. चला जाणून घेऊ आंब्याचे फायदे. 

वजन कमी करते - लठ्ठपणा कमी करण्यासाठी आंबा हा देखील एक चांगला उपाय आहे. आंब्यामध्ये असलेले फायबर्स शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आंबा खाल्ल्यानंतर भूक कमी होते. ज्यामुळे जास्त खाण्याचा धोका कमी होतो.

स्मरणशक्ती वाढवते - ज्यांना स्मृतीभ्रंश आहे त्यांनी आंब्याचे सेवन करावे, त्यात आढळणारे ग्लूटामाइन ऍसिड नावाचे तत्व स्मरणशक्ती वाढविण्यास उत्प्रेरक म्हणून काम करते. यासोबतच रक्तपेशीही सक्रिय होतात, त्यामुळे गर्भवती महिलांना आंबा खाण्याचा सल्ला दिला जातो.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते - जर तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर आंब्याचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

त्वचा चांगली राहते - आंब्याच्या पल्पचा पॅक चेहऱ्यावर लावल्याने किंवा चेहऱ्यावर चोळल्याने चेहरा सुधारतो आणि व्हिटॅमिन सीमुळे संसर्गापासूनही बचाव होतो.

पचन व्यवस्थित होते - आंब्यामध्ये अनेक एन्झाईम असतात जे प्रथिने तोडण्याचे काम करतात. त्यामुळे अन्न लवकर पचते. यासोबतच यामध्ये असलेले सायट्रिक अॅसिड, टार्टरिक अॅसिड शरीरातील क्षारीय घटकांना संतुलित ठेवते.

कॅन्सरपासून बचाव करते - आंब्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स कोलन कॅन्सर, ल्युकेमिया आणि प्रोस्टेट कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर आहेत.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget