एक्स्प्लोर

Hartalika : उद्या हरतालिका, जाणून घ्या पूजेची योग्य वेळ, काय आहे व्रत आणि विधी

Hartalika teej vrat: देशातील अनेक भागांत उद्या हरतालिका तृतीया साजरी करण्यात येते. हरतालिका तृतीयेच्या निमित्ताने महिला निर्जल उपवास करतात.

मुंबई : देशातील अनेक भागांत उद्या हरतालिका तृतीया साजरी करण्यात येते. हरतालिका तृतीयेच्या निमित्ताने महिला निर्जल उपवास करतात. यादिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा-अर्चना केली जाते.हरतालिका तृतीया दरवर्षी भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरी केली जाते. महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा व्रत करतात. यादिवशी महिला दिवसभर काहीच खात नाहीत. त्यामुळे हरतालिकेचा उपवास सर्वात कठिण उपवासांपैकी एक मानला जातो. यंदा 9 सप्टेंबर 2021 रोजी म्हणजेच उद्या देशभरात हरतालिका साजरी केली जाणार आहे. वैवाहिक महिलांसोबतच कुमारीका सुद्धा हरतालिकेचा उपवास करतात. हा व्रत केल्यानं मनासारखा जोडीदार मिळतो, असं सांगितलं जातं. त्यामुळे कुमारीका सुद्धा हे व्रत करतात.

पुजेची वेळ

भाद्रपद शुक्ल तृतियेला म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी हरतालिकेच्या पूजेसाठी योग्य मुहूर्त सकाळी 6 वाजून 3 मिनिटांपासून सकाळी 8 वाजून 33 मिनिटांपर्यंत चांगला मुहूर्त आहे तर प्रदोष काल हरितालिका व्रत पूजा मुहूर्त हा सायंकाळी 6 वाजून  33 मिनिटापासून ते रात्री 8 वाजून 51 मिनटांपर्यंत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी शिव-पार्वतीच्या मातीच्या मूर्तीचं (पिंडीचं) विसर्जन करून महिला हा व्रत पूर्ण करतील.

भगवान शंकरासाठी देवी पार्वतीने केलं होतं व्रत
हरतालिका तृतीया साजरी करण्यामागे अशी अख्यायिका आहे की, भगवान शंकरासाठी देवी पार्वतीने सर्वात आधी हरतालिकेचं व्रत केलं होतं. हरतालिका दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेला शब्द आहे. एक हरत आणि दुसरं आलिका. यामध्ये हरत चा अर्थ होतो अपहरण आणि आलिका चा अर्थ होतो सहेली. हे दोन शब्द एकत्र येऊन हरतालिका हा शब्द तयार झाला आहे.

हरतालिकेची एक पौराणिक कथा आहे. यानुसार, पार्वतीच्या मैत्रिणी तिचं अपहरण करून तिला जंगलात घेऊन गेली होती. पार्वतीच्या इच्छेव्यतिरिक्त भगवान विष्णुने तिच्याशी विवाह करू नये म्हणून तिच्या मैत्रिणी तिला जंगलात घेऊन जातात. तिथे देवी पार्वतीने भगवान शंकराची आराधना केली आणि भाद्रपद शुल्क तृतीयेच्या दिवशी मातीचं शिवलिंग तयार करून त्याची पुजा केली. पार्वतीच्या तपस्येने प्रसन्न होऊन भगवान शंकराने देवी पार्वतीचा पत्नी म्हणून स्विकार केला.

महत्त्वाच्या बातम्या

Wardha Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
Nagpur FDA Raid: नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
Beed Crime: बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
Sonam Wangchuk Jantar Mantar Protest: 'मी आजच आमरण उपोषण मागे घेतो पण....'; सोनम वांगचूक यांच्या केंद्र सरकारसमोर 'या' तीन अटी
'मी आजच आमरण उपोषण मागे घेतो पण....'; सोनम वांगचूक यांच्या केंद्र सरकारसमोर 'या' तीन अटी

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
Nagpur FDA Raid: नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
Beed Crime: बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
Sonam Wangchuk Jantar Mantar Protest: 'मी आजच आमरण उपोषण मागे घेतो पण....'; सोनम वांगचूक यांच्या केंद्र सरकारसमोर 'या' तीन अटी
'मी आजच आमरण उपोषण मागे घेतो पण....'; सोनम वांगचूक यांच्या केंद्र सरकारसमोर 'या' तीन अटी
FIFA World Cup 2026 : स्पेन पुन्हा ठरला जगज्जेता! तब्बल 16 वर्षांनी स्पेननं कोरलं विश्वचषकावर नाव; GOAT मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं
तब्बल 16 वर्षांनी स्पेन पुन्हा ठरला जगज्जेता! फिफा विश्वचषकावर दुसऱ्यांदा कोरलं नाव; GOAT मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा जेतेपदाचं स्वप्न भंगलं
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Maharashtra Live blog updates: मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, तलावांमधील पाण्याचा साठा वाढला
Maharashtra Live blog updates: मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, तलावांमधील पाण्याचा साठा वाढला
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Embed widget