Ayurvedik Tips For Prevent Hair Fall : आजकालच्या काळात बदलती जीवनशैली, वाढणारं प्रदूषण तसेच कामाचा तणाव, पुरेशी झोप न लागणे यांसारख्या अनेक कारणांमुळे केसगळतीची (Hair Fall) समस्या अनेकांना जाणवते. केस गळणे अनेक कारणांमुळे होते आणि त्यापैकी बहुतेक जीवनशैलीशी संबंधित असतात. काही उदाहरणांमध्ये तर अनुवांशिक (Genetic) कारणांमुळे किंवा रोगामुळे देखील केसगळती होते. या ठिकाणी आम्ही तुम्हाला यासाठी काही आयुर्वेदिक (Ayurvedik) उपाय सांगणार आहोत. या आयुर्वेदिक उपायांचा तुम्ही नक्कीच वापर करू शकता.
आवळा पेस्ट आणि तेल
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असते. केस गळणे थांबविण्यासाठी तुम्ही हेअर मास्क म्हणून वापरू शकता. त्याचे तेल तुम्ही केसांनाही लावू शकता. आवळा व्हिटॅमिन-सी, एमिनो अॅसिड आणि अनेक प्रकारच्या खनिजांसह फायटोन्यूट्रिएंट्सने समृद्ध आहे. त्यामुळे केसगळती थांबते.
मेथीचे दाणे
मेथीच्या दाण्यांमध्ये निकोटिनिक अॅसिड आणि प्रोटीन असते. हे दोन्ही मिळून तुमच्या टाळूची छिद्रे पुन्हा सक्रिय करतात आणि केसांच्या वाढीस चालना देतात. मेथीचा हेअर मास्क बनवून केसांना लावा. यासाठी मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा, दुसऱ्या दिवशी या पाण्याने बारीक करून पेस्ट बनवा. तयार केलेल्या पेस्टमध्ये दही, 1 चमचे मोहरीचे तेल आणि मध मिसळा. तुमचा हेअरमास्क तयार आहे. आठवड्यातून एकदा केसांना लावा.
फिश ऑइल
केसांची वाढ आणि जाडी वाढविण्यासाठी तुम्ही तुमच्या केसांना फिश ऑईल देखील लावू शकता. फिश ऑईलमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते. या व्यतिरिक्त, ते अँटिऑक्सिडंट्स आणि आवश्यक प्रथिने समृद्ध आहे. यामुळे केस गळणे कमी होते आणि केसांची वाढ सुधारते.
कांद्याचा रस
कांद्याच्या रसामध्ये सल्फर, मॅग्नेशियम आणि इतर अनेक खनिजे मुबलक प्रमाणात असतात. केसांना लावल्यानंतर पहिल्यांदाच केस गळण्याचे प्रमाण कमी होताना दिसेल. कांद्यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल घटक आढळतात. हे सर्व मिळून केस गळणे कमी करण्यास, त्यांची वाढ वाढवण्यास आणि केस जाड होण्यास मदत करतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :