Akanksha Mohan: मुंबईतील (Mumbai) अंधेरी परिसरात खळबळजनक घटना घडली. एका हॉटेलच्या रुममध्ये आकांशा मोहन या 30 वर्षीय मॉडेलने आत्महत्या (Suicide) केली. पंख्याला गळफास घेत या मॉडेलने तिचं आयुष्य संपवलं. घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे. "आपल्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही. कोणाला डिस्टर्ब करु नका," असं या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. जाणून घेऊयात आकांशा मोहनबाबत...


कोण होती आकांशा मोहन? 
आकांशा ही मॉडेल आणि अभिनेत्री होती. तिनं काही चित्रपटांमध्ये काम केलं होतं. 16 सप्टेंबर रोजी रिलीज झालेल्या सिया या चित्रपटामध्ये आकांशानं शेफाली ही भूमिका साकारली होती. सिया चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटो आकांशा सोशल मीडियावर शेअर करत होती. आकांशा ही वेगवेगळ्या जाहिरातींसाठी मॉडेल म्हणून काम करत होती. तसेच वेगवेगळ्या ब्रँडसाठी तिनं फोटोशूट देखील केलं.


आकांशाचे इन्स्टाग्रामवर जवळपास 11 हजारपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. आकांशानं तिच्या इन्स्टाग्रामवरील बायोमध्ये तिनं इंजिनिअरिंग आणि एमबीए केलं आहे,असं लिहिलं आहे. तसेच आकांशा ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत होती. वर्कआऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ आकांशा सोशल मीडियावर शेअर करत होती. तसेच आकांशा तिचा डाएट प्लॅन देखील सोशल मीडियावर शेअर करत होती. आकांशाला नृत्याची देखील आवड होती. वेगवेगळ्या गाण्यांवरील डान्सचे व्हिडीओ आकांशा शेअर करत होती. 






आकांशा ही अंधेरी पश्चिम परिसरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला होती. वर्सोवा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आकांशानं हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (29 सप्टेंबर) हॉटेलच्या वेटरने रुमची बेल वाजवली. अनेक वेळा बेल वाजवूनही रुमचा दरवाजा उघडला नाही. वेटरने ही माहिती हॉटेलच्या मॅनेजरला दिली. मॅनेजरने तात्काळ पोलिसांना फोन करुन कळवलं. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Mumbai Crime : "मी खुश नाही, फक्त शांतता हवी होती", सुसाईड नोट लिहित हॉटेलच्या रुममध्ये मॉडेलने आयुष्य संपवलं