Gold Rate Today : साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण म्हणजेच दसरा (Dussehra). या निमित्ताने ग्राहक सोने खरेदी करतात. मात्र, ग्राहकांसाठी आज सोने खरेदीचा चांगला दिवस म्हणता येणार नाही. कारण आज आठवड्याच्या पाचव्या दिवशी सोन्याच्या दराबरोबरच चांदीच्या दरातही वाढ (Gold-Silver Rate) झाली आहे. सोन्याच्या दराने आज 50,000 आकडा पार केला आहे. फेडरल रिझर्व्हच्या गुरुवारी बेंचमार्क व्याजदर वाढविण्याच्या निर्णयानंतर अमेरिकन डॉलरच्या किंमतीत वाढ झाली आहे. याचाच परिणाम भारतीय बाजारपेठेवरही झाला आहे. यूएस फेड रिझर्व्हच्या (US Federal Reserve) घोषणेनंतर यूएस डॉलर निर्देशांक 20 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.50 टक्क्यांनी घसरून 24 कॅरेट सोन्याचा दर 50,250 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 46,063 रुपये आहे.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :
मुंबईतील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,25022 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,063
1 किलो चांदीचा दर - 56,500
पुण्यातील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,25022 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,063
1 किलो चांदीचा दर - 56,500
नाशिकमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,510 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,072
1 किलो चांदीचा दर - 56,540
नागपूरमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,510
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,072
1 किलो चांदीचा दर - 56,540
दिल्लीमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,170
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 45,989
1 किलो चांदीचा दर - 56,440
कोलकत्तामधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 50,190
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 46,008
1 किलो चांदीचा दर - 56,460
जागतिक बाजारपेठेतील सोन्या-चांदीचे दर :
स्पॉट गोल्ड 0110 GMT नुसार 0.2 टक्क्यांनी वाढून $1,663.79 प्रति औंस झाला. किमती सात मधील त्यांच्या सर्वात मोठ्या साप्ताहिक नफ्याकडे जात असताना, आतापर्यंतच्या महिन्यासाठी ते 2.8 टक्क्यांनी खाली आले आहे. यूएस सोन्याचे फ्युचर्स 0.3 टक्क्यांनी वाढून $1,673.10 वर पोहोचले. स्पॉट सिल्व्हर 0.2 टक्क्यांनी वाढून $18.86 प्रति औंस, प्लॅटिनम $865.46 वर स्थिर होते आणि पॅलेडियम 0.5 टक्क्यांनी वाढून $2,211.59 वर होते.
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा (Check Gold Purity) :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्वाच्या बातम्या :