Weight Loss : शरीराची हलचाल कमी केली किंवा जंक फूडचं सेवन मोठ्या प्रमाणात केलं तर वजन वाढते. काही लोक वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाऊन वर्क आऊट करतात. वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी जिममध्ये जाऊन व्यायाम करायला तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही काही टिप्स फॉलो करुन वजन कमी करु शकता. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल करावे लागतील. डाएटमध्ये बदल केल्यानं आणि या सवयी सोडल्यानं वजन झटपट कमी होऊ शकतं. वजन कमी करण्यासाठी या सवयी तुम्हाला सोडाव्या लागतील.
जंक फूड कमी खा
जंक फूडमध्ये प्रिजर्वेटिव असतात. त्यामुळे वजन वाढत नाही. पिझ्झा, बर्गर आणि पास्ता यांसारख्या जंक फूड्सचं सेवन केल्यानं वजन झपाट्यानं वाढते. तसेच शरीरात फॅट्सचे प्रमाण देखील वाढते. जंक फूड ऐवजी तुम्ही बाहेर गेल्यावर फ्रुट प्लेट किंवा सॅलड खाऊ शकता.
रात्री उशीरापर्यंत जागं राहू नका
अनेकांना रात्री उशीरा झोपण्याची सवय असते. काही लोक मोबाईलवर गेम खेळतात तर काही लोक रात्री टिव्ही पाहतात. रात्री उशीरा झोपल्यानं स्ट्रेस वाढतो. त्यामुळे वजन देखील वाढते. रात्रीचं जेवण 7.30 ते 8 वाजता करा आणि दहा वाजेपर्यंत झोपा.
सकाळी उशीरा उठणे
अनेकांना सकाळी उशीरा उठायची सवय असते. सकाळी उशीरा उठण्याची सवय जर तुम्हाला असेल तर तुमचे वजन वाढू शकते. रात्री सकाळी लवकर उठून वॉक केल्यानं आणि योगा केल्यानं वजन कमी होते. एक चमचा मेथीचे दाणे आणि ओवा एका ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजवा. त्यानंतर हे पाणी गरम करुन गाळणीनं गाळा. हे पाणी रोज सकाळी प्या.
गोड आणि तेलकट पदार्थ खाणं टाळा
अनेकांना गोड खायची सवय असते. साखर किंवा गुळामुळे वजन वाढते. तसेच तेलकट पदार्थ खाल्यामुळे शरीरातील फॅट्स वाढतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
वाचा इतर बातम्या: