नागपूरः जादुटोन्याच्या संशयावरुन पाच वर्षाच्या मुलीचा छळ करीत तिला बेदम मारहाण करण्यात तिची स्वतःची बहिणही मागे नव्हती. ती आणि तिचा मावस भाऊही चिमुकलीला बेदम मारहाण करायचे, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रकरणात आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


पाच वर्षांची चिमुकली अन्नशीला आई-वडिलांनीतच  मारून टाकले. तिच्यात दुष्ट आत्म शिरल्याचे आई-वडिलांना वाटत होते. चिमुकलीला मारहाण करण्यात 16 वर्षीय बहिण आणि 11 वर्षीय मावस भाऊही सहभाही होता. याबाबत तयार केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांचाही व्हिडीओ असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांनाही पोलिसांनी बाल हक्क आयोगासमोर सादर करण्यात आले होते. दरम्यान पोलिसांनी नामदेव बांबोडे ऊर्फ शंकर बाबा (वय 50 रा. चंद्रपूर) याला अटक केले. पोलिसांनी न्यायालयासमोर सादर करीत 12 पर्यंत पोलिस कोठडी मिळविली आहे. दरम्यान, महिला आयोग आणि नागरी हक्क संरक्षण आयोगानेही या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांकडून अहवाल मागविला आहे.


अनेकांना आश्चर्य


आपल्या यु-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न आणि समस्या मांडणाऱ्या सिद्धार्थला आपल्या आयुष्याचे प्रश्न सोडविता आले नाही. सिद्धार्थ जादुटोण्याच्या संशयावरुन पोटच्या पोरीचा छळ करीत तिचा खून करेल यावर अद्यापही कुणाचा विश्वास बसत नसल्याचे दिसून येत नसून त्याच्या या कृत्याने नातेवाईकही स्तब्ध आहेत.


अशी घडली घटना...


नागपूरच्या सुभाष नगर परिसरात राहणाऱ्या सिद्धार्थ चिमणे व त्याची पत्नी रंजना चिमणे यांना सहा वर्षीय मुलगी होती. गेले काही दिवसांपासून मुलीची अवस्था, सतत आजारी राहणे आणि तिचे हावभाव लक्षात घेऊन तिला भूतबाधा झाल्याची चिमणे दांपत्यांना शंका होती. एका भोंदू बाबाच्या सल्ल्याने त्यांनी तिच्यावर वेगवेगळे उपचार सुरू केले होते. मात्र त्याचा काहीच फायदा होत नव्हता. याला कंटाळून शुक्रवार आणि शनिवारच्या दरम्यानच्या रात्री चिमणे दांपत्य आणि त्यांच्या एका महिला नातेवाईकाने घरातच भूत बाधेतून मुक्त करण्याच्या नावाखाली सहा वर्षीय मुलीला बेल्ट आणि हाताने जबर मारहाण केली. चिमुकली जबर मारहाण सहन करू शकली नाही आणि निपचित पडली. 


मेडीकलच्या आवारात मृतदेह सोडून पसार


घाबरलेल्या आई-वडिलांनी लगेच तिला घेऊन रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र उपचारा पूर्वीच मुलीचा मृत्यू झाला होता. आरोपी आई-वडील एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी आपण पकडले जाऊ या भीतीने मुलीचे मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या आवारात ठेवून तिथून पळ काढले. मात्र, रुग्णालयाच्या आवारात एका लहान मुलीचे मृतदेह बेवारस असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केले.


Maharashtra Cabinet Expansion : 'पुरुषप्रधान' मंत्रिमंडळ! शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही