Top 10 Tourist Places in India : भारताला उत्तम निसर्ग सौंदर्याचा वारसा लाभला आहे. देशात अनेक प्रसिद्ध आणि सुंदर प्रेक्षणीय स्थळं (Tourist Place) आहेत. येथे जगभरातील पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळते. या पर्यटन स्थळांमध्ये भारताचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि विविधतेचं दर्शन घडतं. अगदी हिमाच्छादित प्रदेशापासून हिरवीगार झाडी आणि निळंशार पाणी अशी भारतात अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळं आहेत.


काश्मीर
भारताच्या नकाशाच्या सर्वात वरच्या भागात असणारं काश्मीर स्वर्ग मानलं जातं. काश्मीरमधील निसर्ग सौंदर्याचं शब्दातही वर्णन करतात येणार नाही, असं म्हटलं जातं. त्यासाठी तुम्हाला त्याचा स्वत: त्याचा अनुभव घ्यायला लागेल. काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटलं जातं. काश्मीर हिमालयाच्या पर्वतरांगांनी वेढलेलं आहे. काश्मीरमध्ये अनेक तलाव आणि पर्वत रांगा आहेत. हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.


लडाख
लडाख शांत आणि सुंदर पर्वतरांगांसाठी ओळखले जातं. लडाखला चंद्राची भूमी (Moon Land) असंही म्हणतात. लडाखमधील पाण्याचा मुख्य स्त्रोत म्हणजे येथील बर्फवृष्टी. लडाखला जाणं हे अनेक पर्यटकांचं स्वप्न आहे. तेथील निसर्गाचं वर्णन करावं तितकं कमी आहे. लडाखमधील पँगाँग तलाव त्याच्या विहंगम दृश्यामुळे अतिशय प्रसिद्ध आहे.


गोवा
गोवा भारतातील सर्वात छोटं राज्य आहे. याला लांबच लांब किनारपट्टीचा वारसा लाभला आहे. येथे दरवर्षी सुमारे वीस लाख पर्यटक भेट देतात. गोव्यामध्ये फार सुंदर आणि प्रसिद्ध बीच आहेत. तसेच येथील नाईटलाईफ आणि वॉटर स्पोर्टसह येथील खाद्यपदार्थ पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहे.


केरळ
केरळ हे दक्षिण भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. केरळ निसर्ग सौंदर्यानं नटलेलं आहे. येथील सुंदर समुद्र किनारे आणि हिरवागार निसर्ग पर्यटकांसाठी आकर्षण आहे. केरळ भारतातील सर्वात साक्षर राज्य आहे. केरळ भारतातील पर्यटन स्थळांपैकी प्रमुख आहे.


मुंबई
मुंबई हे शहर सपनों का शहर अर्थात स्वप्न नगरी मानलं जातं. येथे येणाऱ्या प्रत्येकाची स्वप्न या शहरा पूर्ण होतात, असं म्हटलं जातं. मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, सिद्धीविनायक मंदिर, गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल प्रसिद्ध पर्यटन स्थळं आहेत. याशिवाय येथील खाद्यपदार्थांमध्ये वडा पाव, पावभाजी, पाणीपुरी हे प्रसिद्ध आहेत.


राजस्थान
राजस्थान राज्याला फार गौरवशाली इतिहास आहे. अनेक राजांची ही कर्मभूमी आहे. राजस्थानमधील सुंदर राजवाडे आणि वाळवंट यासाठी जगभरातून पर्यटक राजस्थानमध्ये येतात. पिंक सिटी जयपूर, बिकानेर, उदयपूर आणि माऊंटआबू ही प्रसिद्ध स्थळं आहेत. 


दार्जिलिंग
भारतातील दार्जिलिंग ब्रिटीशांच्या काळापासून प्रसिद्ध थंड हवेच ठिकाण आहे. ब्रिटीशांनी येथील माती आणि हवामानाचा अभ्यास करून हे हिल स्टेशन विकसित केलं आहे. दार्जिलिंगमध्ये चहाचे मळे आहेत. 


शिमला
हिमाचल प्रदेशातील शिमला प्रसिद्ध हिलस्टेशनपैकी एक आहे. हे अतिशय निसर्गरम्य ठिकाणं आहे. याला पर्वतरांगाची राजकुमारी असंही म्हटलं जातं. दरवर्षी लाखो पर्यटक शिमला येथे येतात. ही हिमाचल प्रदेशाची राजधानी असून उत्तर भारतातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.


आग्रा
आग्रामधील ताजमहाल जगभरात प्रसिद्ध आहे. मुघल बादशाह शाहजहान यानं त्याच्या बेगमसाठी ताजमहालची निर्मिती केली. ताजमहाल बांधायला सुमारे दोन लाख मजूरांनी 23 वर्ष लागली. ताजमहालला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. आग्रामधील फतेहपूर सिकरी, इमादउदौला मकबरा ही सुद्घा पर्यटनस्थळं आहेत.


अंदमान-निकोबार बेट
भारतातील अंदमान-निकोबार बेट प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक आहे. अंदमान-निकोबार बेट निसर्ग सौंदर्यासाठी सर्वज्ञात आहे. येथील वॉटर स्पोर्ट हे पर्यटकांचं खास आकर्षण आहे.