एक्स्प्लोर

Sunrise Fact : जर सूर्य एकाच ठिकाणी असेल, तर जपानमध्येच प्रथम का उगवतो? खास आहे यामागचं कारण

Sunrise Fact : उगवता सूर्य प्रथम कुठे दिसतो हे तुम्हाला माहिती आहे का? पृथ्वीवरील असे कोणते ठिकाण आहे जिथे सूर्य प्रथम दिसतो?

Sunrise Fact : उगवत्या सूर्याचे (Sun Rise) नयनरम्य दृश्य पाहणे प्रत्येकाला आवडते. दिवसाची चांगली सुरुवात करायची असेल तर सकाळी लवकर उठून सूर्योदय पाहावे, असेही म्हटले जाते. यामुळे संपूर्ण दिवस चांगला असतो. सूर्य पूर्वेकडून उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. पण, प्रत्यक्षात पाहता सूर्य स्वतःच्या जागी स्थिर राहतो आणि पृथ्वी त्याच्याभोवती फिरते. सूर्याच्या प्रदक्षिणाबरोबरच पृथ्वीही स्वत:भोवती फिरते. यामुळे दिवस आणि रात्र होते.

पृथ्वीवरील असे कोणते ठिकाण आहे जिथे सूर्य प्रथम दिसतो?

आपण सर्वांनी सूर्य उगवताना आणि मावळताना पाहिला आहे, परंतु उगवता सूर्य प्रथम कुठे दिसतो हे तुम्हाला माहिती आहे का? पृथ्वीवरील असे कोणते ठिकाण आहे जिथे सूर्य प्रथम दिसतो? या प्रश्नांची उत्तरे खूप मनोरंजक आहेत, हे जाणून घेणे तुमच्यासाठी आश्चर्यकारक आणि माहितीपूर्ण असेल. 

जपानमध्ये सूर्य प्रथम का उगवतो?
यापूर्वी जपान ही सूर्योदयाची भूमी मानली जात होती, परंतु सर्व देशांनी GMT (Greenwich Mean Time) वेळला मान्यता दिली असल्याने, तेव्हापासून हा मान न्यूझीलंडकडे गेला आहे. न्यूझीलंडची वेळ GMT+13 आहे, तर जपानची वेळ GMT+9 आहे. जेव्हा न्यूझीलंडमध्ये सकाळचे 6 वाजलेले असतात, तेव्हा जपानमध्ये रात्रीचे 2 वाजलेले असतात. तसेच, जेव्हा नवीन वर्ष येते, तेव्हा न्यूझीलंडमध्येच नवीन वर्ष प्रथम साजरे केले जाते. या नवीन टाइम झोननुसार, सूर्य जगात प्रथम न्यूझीलंडमध्ये उगवतो.

जपानला उगवत्या सूर्याची भूमी का म्हणतात?
आता प्रश्न असा पडतो की, जपानमध्ये जर सूर्य प्रथम उगवत नाही, तर मग त्याला सूर्योदयाची भूमी का म्हणतात? या देशाला जपानी भाषेत निहोन (निप्पॉन) म्हणतात. निहोन आणि जपान हे शब्द एकाच शब्दापासून आले आहेत, ज्याचा शाब्दिक अर्थ "जेथे सूर्य उगवतो" असा होतो. इटालियन व्यापारी आणि प्रवासी मार्को पोलो याने १३व्या शतकात जपानची पाश्चात्य जगाशी ओळख करून दिली. तो प्रत्यक्षात कधीच जपानला गेला नाही, तर त्याऐवजी चीनच्या दक्षिण भागात गेला. तिथे लोकांनी त्याला जपानबद्दल सांगितले. दक्षिण चीनच्या लोकांसाठी, जपान ज्या दिशेला सूर्य उगवतो त्या दिशेने स्थित आहे. म्हणून, लोकांनी त्याला जी-पॅंग किंवा झु-पॅंग म्हटले, ज्याचे भाषांतर "सूर्याचे मूळ" म्हणून देखील केले जाऊ शकते, याचा अर्थ सूर्य उगवतो ते ठिकाण.

जपानी "उगवत्या सूर्याचा ध्वज"

जपानच्या राष्ट्रीय ध्वजाला "उगवत्या सूर्याचा ध्वज" म्हणतात. 7 व्या शतकाच्या सुरूवातीस, मध्यभागी सूर्य असलेला जपानी ध्वज प्रथमच वापरला गेला. मात्र, त्यावेळच्या ध्वजाचे रंग आताच्या रंगांपेक्षा वेगळे होते, असे सांगितले जाते. त्यावेळच्या ध्वजावर पिवळा सूर्य आणि लाल पार्श्वभूमी होती. हा ध्वज एखाद्याचे राष्ट्रीयत्व दर्शविण्यासाठी जहाजांवर वापरला जात असे. याशिवाय इतरही अनेक ठिकाणी त्याचा वापर केला जात होता.

इतर बातम्या

Lesbian Couple Photoshoot: लेस्बियन कपलचे अनोखे फोटोशूट व्हायरल, 'अशी' आहे अदिला-फातिमाची प्रेमकहाणी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
Embed widget