Father's Day 2024 : तुमचं वडिलांसोबतचं नातं कसंय? आईसारखंच Bonding वडिलांसोबत निर्माण करायचंय तर या टिप्स उपयुक्त ठरतील.
Father's Day 2024 : अनेकदा असे दिसून येते की, मुलं वडिलांसोबत फारसे बोलत नाहीत. फादर्स डेच्या निमित्ताने काही टिप्स जाणून घेऊया, ज्याच्या मदतीने वडिलांसोबतचे नाते अधिक घट्ट होऊ शकते.
Father's Day 2024 : बहुतेक घरात आई ही प्रेमळ स्वभावाची असते, आणि बाबा कठोर स्वभावाचे असतात. अनेक घरात मुलांचं आईसोबत जितकं बॉंडिंग असतं तितकं वडिलांशी कमी असतं. कारण वडिलांबद्दल आदरयुक्त भीती असल्यामुळे मुलं त्यांच्यासी मोकळेपणाने बोलायला घाबरतात. यंदा फादर्स डे (Father's Day 2024) 16 जून रोजी साजरा केला जात आहे. तुम्ही तुमच्या भावना तुमच्या आईसोबत शेअर करू शकता, परंतु अनेकदा असे दिसून येते की, मुलं वडिलांसोबत फारसे बोलत नाहीत. अशात, फादर्स डेच्या निमित्ताने काही टिप्स जाणून घेऊया, ज्याच्या मदतीने वडिलांसोबतचे नाते अधिक घट्ट होऊ शकते.
आई-वडिलांची जागा दुसरा कोणी घेऊ शकत नाही
मुलांच्या आयुष्यात आई-वडिलांची जागा दुसरा कोणी घेऊ शकत नाही. लोक अनेकदा त्यांच्या भावना त्यांच्या आईसोबत शेअर करतात, परंतु बहुतेक मुले त्यांच्या भावना त्यांच्या वडिलांसोबत शेअर करू शकत नाहीत. अशा स्थितीत हे अंतर मनाला खोलवर दुखवते. तुम्हीही तुमच्या वडिलांसोबत औपचारिक राहण्याचा प्रयत्न करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. येथे नमूद केलेल्या या टिप्सचा अवलंब करून तुम्ही तुमच्या वडिलांसोबतचे नाते अधिक घट्ट करू शकता.
भावना समजून घ्या
वडिलांसोबत किरकोळ वाद होणे सामान्य आहे. अशा वेळी तुमची प्रतिक्रिया किंवा राग लगेच व्यक्त करण्याऐवजी त्यांचे ऐकण्याची सवय लावा. त्यामुळे त्यांची बाजू ऐकायची नाही हा त्यांचा गैरसमज दूर होईल. अनेकदा आपण रागाच्या भरात काही बोलतो, ज्याचा आपल्याला नंतर पश्चाताप होतो.
वडिलांसोबत वेळ घालवा
मुलं स्वयंपाकघरातही आईची पाठ सोडत नाहीत, पण जेव्हा वडिलांसोबत वेळ घालवायचा प्रसंग येतो तेव्हा काही मुलं अनेकदा औपचारिक होण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्हीही तुमच्या वडिलांसमोर मर्यादेत बोलत असाल आणि वागत असाल तर हळूहळू ही सवय बदलण्याचा प्रयत्न करा. सकाळी किंवा रात्रीच्या जेवणानंतर त्यांना फिरायला घेऊन जा आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा.
उपक्रमांमध्ये सहभागी व्हा
तुम्ही तुमच्या वडिलांसोबतच्या काही ॲक्टिव्हिटीजला तुमच्या दिनक्रमाचा एक भाग बनवून हे बंध आणखी घट्ट करू शकता. उदाहरणार्थ, जर त्यांना बागकाम आवडत असेल तर तुम्ही त्यांना त्यांच्या सुट्टीच्या दिवशी या कामात मदत करण्याचा प्रयत्न केली पाहिजे. कारण या काळात तुमचे संभाषण खूप वाढेल आणि तुम्ही त्यांच्याशी औपचारिकतेऐवजी मनमोकळेपणाने वागू लागाल.
वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या
आपल्या वडिलांची तब्येत चांगली असावी अशी प्रत्येक मुलाची इच्छा असते, परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की, संवादाच्या कमतरतेमुळे त्यांना असे वाटते की आपण त्यांची कधीही काळजी घेत नाही. अशात तुम्ही त्यांची औषधे, चाचण्या इत्यादींबाबत नेहमी अपडेट राहावे आणि त्यांच्या आहाराचीही विशेष काळजी घ्यावी.
हेही वाचा>>>
Father's Day 2024 :'आईच्या प्रेमासाठी आसुसलेल्या 5 भावंडांसाठी वडिलांनी असं काही केलं..! 'फादर्स डे' ची सुरूवात 'अशी' झाली, जाणून घ्या महत्त्व
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )