Fashion Tips : ही चेष्टा नाही पण खरं आहे; तुमचे कपडेसुद्धा तुमच्या मूडवर परिणाम करतात, कसे ते जाणून घ्या
Fashion Tips : कपड्यांचा आपल्या मनःस्थितीवर आणि आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो.
Clothes Ruin and Influence Our mood : आपल्या कपड्यांबाबत आपण अनेकदा खूप सतर्क असतो. विशेषत: मुली त्यांच्या कपड्यांबाबत फारच कॉन्शियस असतात. कारण यामुळे आपलं व्यक्तिमत्व सुधारण्यास मदत होते. चारचौघांत आपलं वेगळं अस्तित्व दिसून येतं. तुम्हाला कधी कोणतेही कपडे परिधान करताना आत्मविश्वास वाटला आहे किंवा तुम्ही कधी स्वत:ला इतरांपेक्षा कमी छान दिसता असं कधी तुम्हाला वाटलं आहे का? अर्थात, कधी ना कधी आपल्या कपड्यांमुळे आपल्या सर्वांनाच या समस्यांचा सामना करावा लागला आहे आणि कधीकधी आपल्याला खूप आत्मविश्वासही वाटला आहे. कपड्यांचा आपला मूड आणि व्यक्तिमत्व या दोन्हींवर परिणाम होतो यात शंका नाही.
कपड्यांचा आपल्या मनःस्थितीवर आणि आत्मविश्वासावर अनेक परिणाम होऊ शकतो. आपण घातलेले कपडे आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि वागणुकीबद्दल बरंच काही सांगू शकतात. म्हणूनच आपले कपडे निवडताना केवळ ड्रेसिंग स्टाईलच नाही तर सर्व महत्त्वाच्या गोष्टींचाही विचार करा. कारण योग्य कपड्यांमुळे तुमचा मूड तर चांगला राहतोच, शिवाय तुमचा आत्मविश्वासही वाढतो.
कपड्यांचा आपल्या मनःस्थितीवर आणि आत्मविश्वासावर कसा परिणाम होतो?
1. आराम मिळतो (कम्फर्ट) : जेव्हा आपण आरामदायक कपडे घालतो तेव्हा आपल्याला अधिक आरामदायक आणि चांगलं वाटतं. तसेच जेव्हा आपल्याला बरे वाटते तेव्हा आत्मविश्वासाची पातळी आपोआप वाढते आणि मूड देखील चांगला राहतो.
2. तुमच्या स्टाईलला फॉलो करा : वैयक्तिक स्टाईल वाढवणारे कपडे देखील तुम्हाला छान वाटतात. अशा कपड्यांमुळे तुमचा आत्मविश्वास तर वाढतोच शिवाय तुम्हाला आरामही वाटतो. जेव्हा आपल्याला असे वाटू लागते की आपण चांगले दिसत आहोत, तेव्हा आपल्याला स्वतःबद्दल आत्मविश्वास वाटतो.
3. प्रसंगानुसार कपडे घाला : एखाद्या खास प्रसंगानुसार कपडे परिधान केल्यानेही तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. जसे की, मुलाखती दरम्यान आपल्याला अनेकदा भीती वाटते पण जेव्हा आपण आपल्या कपड्यांवर कॉन्फिडंट असतो तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या मुलाखतीवर देखील चांगला होतो.
4. रंग निवडा : कपड्यांचा रंग देखील तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित अनेक गोष्टी सिद्ध करतो. वेगवेगळ्या रंगांनुसार वेगवेगळे भाव जागृत होतात. जसे की, पिवळा रंग घातल्यावर फ्रेश वाटतं, पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक आहे.
एकूणच, कपडे सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे आपल्या मनःस्थितीवर आणि आत्मविश्वासावर परिणाम करतात. त्यामुळे नेहमी ठिकाण आणि परिस्थितीनुसार कपडे निवडा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :