Fashion : नवरदेव नारायण जसा..! खऱ्या सोन्याची नक्षी, सुंदर बंद गळा...अनंत अंबानींच्या 'या' ड्रेसची किंमत वाचून थक्क व्हाल
Fashion : लग्नाच्या समारंभात ज्युनियर अंबानीने खास सोन्याचा नक्षीदार सूट परिधान केला होता. जो सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरत होता. या सूटची किंमत पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल..
Fashion : आला नवरदेव वेशीला... देव नारायण जसा.. सध्या असचं काहीसं रुप नवरदेव अनंत अंबानीचं पाहायला मिळत आहे. अंबानी कुटुंबाचा लाडका आणि धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह 12 जुलै 2024 शुक्रवारी संपन्न झाला. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये या लग्नाचे आयोजन करण्यात आले आहे. लग्नापूर्वी झालेल्या प्री-वेडींग कार्यक्रमांत अनंत अंबानी आणि राधिका यांनी परिधान केलेल्या कपड्यांची लोकांमध्ये विशेष चर्चाही झाली. 5 जुलै रोजी झालेल्या संगीत समारंभात ज्युनियर अंबानीने खास सोन्याचा नक्षीदार बांधगला सूट परिधान केला होता. जो सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरत होता. या सूटची किंमत पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल..
देशात आणि जगात अनंत-राधिकाच्या लग्नाची चर्चा..!
अवघ्या देशात आणि जगात मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत आणि वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका यांच्या लग्नाची चर्चा आहे. हा विवाह भारतातील सर्वात महागड्या आणि प्रसिद्ध विवाहांपैकी एक मानला जातो. हे लग्न भव्यता, लक्झरी आणि संपत्तीचे प्रतीक आहे. या लग्नाला हजेरी लावण्यासाठी बॉलीवूड स्टार्स, राजकारणी, क्रीडा आणि व्यावसायिक जगतातील नामांकित व्यक्ती दाखल झाले होते. या प्रसंगी, अनंत आणि राधिकाने परिधान केलेले कपडे अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. अनंत अंबानी यांनी संगीतात परिधान केलेला असाच एक सोन्याचा पोशाख, ज्याची खूप चर्चा आहे. लोकांना जाणून घ्यायचे आहे की, या ड्रेसमध्ये काय खास आहे, त्याची किंमत किती आहे?
सोन्याचा आउटफिटमध्ये दिसला ज्युनियर अंबानी
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचे लग्न नुकतेच पार पडले. याआधी 5 जुलै रोजी झालेल्या संगीत सोहळ्यात राधिका सुंदर पोशाखात दिसली होती. अनंत अंबानीचा सोन्याचा सूट अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केला होता. तिने सोनेरी नक्षी असलेला मिडनाइट ब्लू बंधगला घातला होता. या शाही सोहळ्यात बॉलिवूडचे अनेक स्टार्सही सहभागी झाले होते. या शाही निळ्या नक्षीदार बांधगला सूटला 'द मिडनाईट गार्डन' म्हणतात. अनंत अंबानींची विशेष मागणी होती की सूट बनवताना खरा सोन्याचा धागा आणि ब्रोकेड वापरावे. या सूटची अधिकृत किंमत नमूद करण्यात आलेली नाही. मात्र, त्याची किंमत काही लाख रुपये असल्याचे समजते.
कोट्यवधी किमतीच्या घड्याळांचा संग्रह
नीता आणि मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंतलाही ॲक्सेसरीजचा शौक आहे. त्याच्याकडे घड्याळांचा मोठा संग्रह आहे. त्यांची किंमत सुमारे 200 कोटी रुपये आहे. अनंतने त्याच्या संगीताच्या पोशाखात डायमंड जडलेल्या टायगर ब्रोचने ऍक्सेसराइज केले आणि केस मागे खेचून त्याचा लूक साधा ठेवला. 5 जुलै रोजी नीता अंबानी मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला लेहेंगा चोली परिधान करताना दिसल्या. तर राधिकाने पारंपारिक जरदोजी एम्ब्रॉयडरीसह लेहेंगा परिधान केला होता. तिच्या बनारसी दुपट्ट्यावरही जरीचं काम होतं.
हेही वाचा>>>
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )