आता जुन्या कपडयांवर मिळणार ब्रँडेड! सणासुदीत मुकेश अंबानींची मध्यमवर्गीयांना खास भेट, वाचा सविस्तर
लवकरात लवकर घरातील कपडे तपासा, जे वापरात नाहीत ते निवडा आणि जवळच्या स्टोअरला भेट द्या. वाचा सविस्तर

Lifestlye: सणासुदीचा हंगाम जवळ येतोय आणि त्यासाठी खरेदीचे बेत सुरू झाले आहेत. श्रावण महिन्यापासूनच विविध सणांना सुरुवात होते आणि नवीन कपड्यांची मागणीही वाढते. मात्र मध्यमवर्गीयांसाठी ब्रँडेड कपड्यांची खरेदी ही आव्हानात्मक ठरते. हाच विचार लक्षात घेऊन रिलायन्स रिटेलने 'फॅशन फॅक्टरी एक्सचेंज फेस्टिव्हल' सुरू केला आहे , जो सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
या फेस्टिव्हलअंतर्गत ग्राहकांना त्यांच्या जुन्या कपड्यांच्या बदल्यात नवीन ब्रँडेड कपड्यांवर सवलत दिली जाते. घरात पडून असलेले जुने डेनिम, टी-शर्ट, शर्ट किंवा मुलांचे कपडे स्टोअरमध्ये आणल्यास त्यावर ठराविक रकमेचे एक्सचेंज कूपन दिले जाते. या कूपनचा वापर करून ग्राहक नव्या खरेदीवर 50% पर्यंत सूट मिळवू शकतात.
जुन्या कपडयांच्या बदल्यात जगभरातले टॉप ब्रँड मिळणार
या उपक्रमामुळे ग्राहकांना केवळ बचतच नाही, तर दर्जेदार ब्रँडेड कपडे परवडणाऱ्या किमतीत मिळणार आहेत. विशेष म्हणजे, फॅशन फॅक्टरीमध्येया एक्सचेंज फेस्टिव्हलमध्ये तुम्ही ली, ली कूपर, जॉन प्लेयर्स, रेमंड, पार्क अव्हेन्यू, कॅनो, पीटर इंग्लंड, एलन सॉली, व्हॅन ह्यूसेन, लुई फिलिप यांसारखे आघाडीचे ब्रँड्स उपलब्ध आहेत. ही संधी 20 जुलै 2025 पर्यंत उपलब्ध आहे आणि ती देशभरातील सर्व फॅशन फॅक्टरी स्टोअर्समध्ये लागू आहे. त्यामुळे लवकरात लवकर घरातील कपडे तपासा, जे वापरात नाहीत ते निवडा आणि जवळच्या स्टोअरला भेट द्या. या स्कीमचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती पर्यावरणपूरक आहे.
कोणते कपडे स्टोअरमध्ये आणता येणार?
रिलायन्सच्या फॅशन फॅक्टरी एक्सचेंज फेस्टिव्हलमध्ये तुम्ही तुमचे जुने कपडे घेऊन गेलात, की त्याबदल्यात तुम्हाला आकर्षक कूपन मिळणार आहेत. तुम्ही डेनिम, शर्ट, टी-शर्ट किंवा मुलांचे कपडे स्टोअरमध्ये आणू शकता आणि त्यांच्या बदल्यात कंपनी खालीलप्रमाणे एक्सचेंज कूपन देणार आहे:
डेनिमसाठी – ₹400 पर्यंत
शर्टसाठी – ₹250 पर्यंत
टी-शर्टसाठी – ₹150 पर्यंत
मुलांच्या कपड्यांसाठी – ₹100 पर्यंत
हा एक्सचेंज फेस्टिव्हल विशेषतः श्राणव महिना आणि येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलाय. लोक सणांच्या निमित्ताने बजेटमध्ये नवीन कपडे खरेदी करू शकणार आहे.
हेही वाचा























