Earth Water On Moon : नासाच्या नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की, पृथ्वी सोडून इतर ठिकाणी पाणी आहे का, याचा शोध लवकरच संपुष्टात येणार असल्याचं सांगण्यात येतंय. काही महिन्यांपूर्वी चीनच्या (China) ‘चँग 5’ या या चंद्रावर उतरलेल्या लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी (water on moon) असल्याचा पहिला थेट पुरावा सापडला आहे. नासा यावर्षी अंतराळवीरांचा एक क्रू चंद्रावर पाठवण्याचा विचार करत आहे. या वर्षी आर्टेमिस I मिशनद्वारे हा प्रोजेक्ट सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती नासाच्या सुत्रांकडून समजत आहे. जाणून घ्या.


चंद्रावर कायमस्वरूपी मानवी जीवन राहू शकते का?


पहिल्या टप्प्यात, आर्टेमिस I नॉन-क्रू फ्लाइट याबाबत चाचणी करेल,  मुळात चंद्रावर कायमस्वरूपी मानवी जीवन राहू शकते का? याची चाचणी केली जाईल. नासाच्या आर्टेमिस प्रकल्पाची गुरुकिल्ली म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी शोधणे! मानवतेच्या अस्तित्वासाठी हा सर्वात आवश्यक प्रोजेक्ट आहे. हे नवीन संशोधन चंद्राबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच भविष्यातील प्रकल्पांसाठी मौल्यवान माहिती मिळवू शकेल. अशी आशा नासाला आहे. इतकेच काय, तर चंद्रावर पाणी असू शकते आणि त्यातील काही स्त्रोत पृथ्वीशिवाय इतर कोणाकडेही नाही. यावर देखील नासाकडून पुष्टी करण्यात येईल


चंद्रावरील पाण्याचे आणि बर्फाचे स्रोत


अलास्का फेअरबँक्स जिओफिजिकल इन्स्टिट्यूट विद्यापीठाच्या नेतृत्वाखालील संशोधनाने असे सुचवले आहे की, पृथ्वीच्या वरच्या वातावरणातून बाहेर पडणारे हायड्रोजन आणि ऑक्सिजन चंद्रामध्ये विलीन होणे हे चंद्रावरील पाण्याचे आणि बर्फाचे स्रोत असू शकतात. एका रिपोर्टमध्ये असे नमूद करण्यात आले की, "चंद्र वेळोवेळी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातून फिरतो, ज्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे कण असतात. यामुळे चंद्रावर पाण्याची संभाव्य घनता शोधली जाऊ शकते असे नासाचे म्हणणे आहे.


पृथ्वीचे वातावरण आणि चंद्राचे पाणी यांच्यातील संबंध काय?
ताज्या संशोधनानुसार, चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशांमध्ये पृथ्वीच्या वातावरणातून बाहेर पडलेल्या बर्फामुळे तयार झालेले 3,500 घन किलोमीटर (840 घन मैल) पृष्ठभागावरील पर्माफ्रॉस्ट किंवा भूमिगत द्रव पाणी असू शकते. उत्तर अमेरिकेतील ह्युरॉन तलाव या जगातील आठव्या क्रमांकाच्या सरोवराचा आकाराच्या नुसार समान आहे. चंद्रावर पोहोचणाऱ्या पृथ्वीच्या वातावरणातील 1 टक्के भागाच्या सर्वात लहान क्षेत्राचा वापर संशोधनासाठी करण्यात येणार असल्याचे नासाकडून सांगण्यात येते. चंद्राच्या पृष्ठभागावरील पाणी लघुग्रह आणि धूमकेतूंची टक्कर झाल्यामुळे जमा झाल्याचे मानले जाते, तर सौर वाऱ्यामुळे देखील चंद्रावरीलच पाण्याचा स्रोत निर्माण झाल्याचे म्हटले जाते. शास्त्रज्ञांनी असे सुचवले आहे की, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या खाली जात असताना चंद्रामध्ये जातात, त्यामुळे इथे पाण्याची शक्यता निर्माण झाल्याचे नासाचे म्हणणे आहे.


संबंधित बातम्या


सौरवादळ पृथ्वीवर धडकण्याची भीती; जगभरातील वीज पुरवठा होऊ शकतो खंडित


Photo Gallery : अंतराळातून काढले माउंट एव्हरेस्टचे छायाचित्र! असे दृश्य तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसेल..